AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉर्नोग्राफी हे व्यसन नाही, मानस शास्त्रज्ञांचं मत, मग धोका कधी?

2019 मध्ये जगातील एका प्रमुख पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांची एका दिवसांची संख्या 115 दशलक्ष होती. Pornography is not addictions

पॉर्नोग्राफी हे व्यसन नाही, मानस शास्त्रज्ञांचं मत, मग धोका कधी?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 22, 2021 | 10:52 AM
Share

नवी दिल्ली: जगभरात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या प्रंचड आहे. भारत सरकारनं देशामध्ये अशा साईटसवर बंदी घातलेली आहे. 2019 मध्ये जगातील एका प्रमुख पॉर्न वेबसाईट पाहणाऱ्यांची एका दिवसांची संख्या 115 दशलक्ष होती. मात्र, पॉर्न पाहणं व्यसन आहे का? अनेकांना पॉर्न पाहणं हे व्यसन असल्यासारखं वाटतं. मानसशास्त्रज्ञांना याविषयी काय वाटतं. मानसशास्त्रज्ञांनी मात्र याविषयी वेगळंच मत नोंदवलं आहे. (Leading Psychologists said Pornography is not addiction like other addictions)

पॉर्न पाहणं व्यसन आहे का? शास्त्रज्ञांना काय वाटतं?

अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ या विषयाबद्दल वेगळी मत मांडतात. अमेरिकन सायकोलॉजिकलअसोसिएशननं पॉर्न पाहणं हा ड्रग्ज घेणे किंवा दारु पिणे यासारखं व्यसन नसल्याचं म्हटलं आहे. व्यसन या प्रकारात येणाऱ्या जुगार, दारु, अंमली पदार्थ आणि ऑनलाईन गेमिंग हे जसं व्यसन आहे, त्यासारखं पॉर्न पाहणं व्यसन या प्रकारात गणलं जाऊ शकत नाही, असं निरीक्षण देखील नोंदवण्यात आलं आहे.

पॉर्न पाहण्याचा मेंदूवर काय परिणाम होतो?

मानसशास्त्रज्ञ पॉर्न पाहण्याला व्यसन मानत नाहीत, याचं एक कारण म्हणजे पॉर्न पाहताना मेंदूमधील घडणाऱ्या क्रिया आहेत. शास्त्रज्ञ असं मानतात की पॉर्न पाहताना मेंदूतील काही पेशी सक्रीय होतात, ज्या दारू पिल्यानंतर किंवा अंमली पदार्थ घेतल्यानंतर देखील होतात पण त्याला व्यसन मानता येणार नाही.

पॉर्न पाहणं व्यसन नाही तर शास्त्रज्ञांना काय वाटते?

काही मानसशास्त्रज्ञ पॉर्न पाहणे हे व्यसन नसून वेडेपणा, सवयीमुळे होणारं वर्तन म्हणतात. काही व्यक्तींना पॉर्न पाहण्याची सवय जडते त्यामागं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी एकाकीपणा अशा गोष्टी कारणीभूत असतात, असं मत मानसशास्त्रज्ञ नोंदवतात. लैगिंक शिक्षणाचा अभाव हे देखील यामागील कारण असल्याचं म्हटलं जातं. 2020 मधील एपीए या संस्थेचा अहवाल असं सांगतो की लोकांच्या सांस्कृतिक, नैतिक, धार्मिक धारणांमुळे त्यांना कमी प्रमाणात पॉर्न पाहिलं तरी व्यसन असल्याचं वाटतं. पॉर्न पाहणं कधी धोकादायक ठरतं हे निश्चित सागंता येणार नाही, कारण ते व्यक्तिपरत्वे ठरते, असं देखील मत शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे.

पॉर्न पाहणं कसं थांबवणार?

मानसशास्त्रज्ञांनी पॉर्न पाहणं कसं थाबवायंचं याविषयी काही मुद्दे मांडले आहेत. पॉर्न पाहिल्यानं तुमच्या आयुष्यावर होणारे नकारात्मक परिणाम समजून घ्यावेत. पॉर्न पाहणं थांबवण्यासाठी नियोजन बनवा. मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवा. काही मानसिक समस्या असल्यास मानसोपचार तज्ञांना भेटा.

संबंधित बातम्या:

porn film shooting case | पॉर्न व्हिडीओ प्रकरणात आणखी एकाला अटक, मोठे खुलासे होण्याची शक्यता

Alert | स्मार्टफोनवर पॉर्न पाहणे पडू शकते भलतेच महागात, जाणून घ्या कसे…

(Leading Psychologists said Pornography is not addiction like other addictions)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.