Diabetes tips: जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

| Updated on: Feb 21, 2022 | 11:57 PM

डायबिटीज ( Diabetes tips in Marathi ) हा असा आजार आहे,जो हळू हळू आपल्या शरीरावर परिणाम दाखवत असतो. या आजाराचे काही विशेष अशी लक्षणं लगेच शरीरावर जाणवू लागतात, यामुळे हा आजार ओळखण्यास मदत होते. तज्ञ मंडळीच्या मते डायबिटीस बद्दल धोक्याची सूचना देणारे असे काही संकेत आहे. जे तुम्हाला लगेच या आजाराबद्दल सांगू शकतील.

Diabetes tips: जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!
जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!
Follow us on

डायबिटीज हल्ली सर्वसामान्य आजार झालेला आहे. हा आजार होण्यामागे अनेकदा जेनेटिक कारण सुद्धा असू शकते परंतु हल्लीची जीवनशैली(Lifestyle) व चुकीचा आहार पद्धती यामुळे अनेकांना हा आजार उद्भवत आहे. अनेकदा हा आजार आपल्याला झालेला आहे, याबद्दल लोकांना फारशी माहिती देखील नसते. या आजारांचे लक्षणं अनेकांना वेळेत कळत नाही. यामुळे अनेक लोकांना भविष्यात अनेक संकटाचा सामना करावा लागतो. एका रिपोर्टनुसार 90% लोकांना खूप वेळेनंतर या आजाराबद्दल कळते. डायबिटीज (Diabetes tips in Marathi) हा असा आजार आहे,जो हळू हळू आपल्या शरीरावर परिणाम दाखवत असतो. या आजाराचे काही विशेष अशी लक्षणं( symptoms) लगेच शरीरावर जाणवू लागतात, यामुळे हा आजार ओळखण्यास मदत होते. तज्ञ मंडळीच्या मते, डायबिटीस बद्दल धोक्याची सूचना देणारे असे काही संकेत आहे, जे तुम्हाला लगेच या आजाराबद्दल सांगू शकतील. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या लक्षणं बद्दल.जे तुम्हाला सांगतील की, भविष्यात तुम्हाला डायबिटीज आजार झाला आहे की नाही…

खाज

वयाचा विशिष्ट टप्पा पार केल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या पाठीवर ,हातांवर आणि पायांवर सातत्याने खाज येत असेल तर अशावेळी अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ञ मंडळीचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीला डायबिटीज हा आजार असू शकतो. काही घटनांमध्ये कमी वय असणाऱ्या व्यक्तींमध्ये सुद्धा ही लक्षणे जाणवू लागतात. उपचार करून सुद्धा तुमच्या अंगावरील खाज कमी होत नसेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. डॉक्टरांना डायबिटीस बद्दल विचारणा देखील करायला हवी.

केस गळणे

हल्ली केस गळणे सर्वसाधारण समस्या झालेली आहे. अनेकदा केस गळण्या मागे प्रदूषण किंवा बदललेली आहार पद्धती सुद्धा कारणीभूत ठरते.तज्ञ मंडळींच्या मते जेव्हा आपले केस गळतात अशावेळी भविष्यात डायबिटीस सुद्धा होऊ शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीज होण्याची काही लक्षणं दिसू लागतात तेव्हा प्रामुख्याने त्या व्यक्तीचे केस देखील गळतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, जर तुमचे केस नेहमी गळत असेल याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डायबिटीज झालेला आहे., परंतु केस जास्त प्रमाणामध्ये गळत असतील तर अशा वेळी डॉक्टरांची अवश्य भेट द्यायला हवी.

वारंवार लघवी होणे

अनेकदा ज्या लोकांना डायबिटीज झालेला असतो, अशा व्यक्तींना लघवीची समस्या त्रास देत असते. या व्यक्तीला वारंवार लघवी लागते. जर तुम्हाला वारंवार लघवी लागत असेल, लघवी करताना त्रास होत असेल तर अशा वेळी तुमच्या शरीरातील डायबिटीस चेक करायला पाहिजे.कदाचित तुम्हाला डायबिटीस असल्यामुळे सुद्धा वारंवार लघवीला होत असेल याची शंका नाकारता येत नाही.

जोराने घोरणे

तसे पाहायला गेले तर नेहमी घोरण्यामागे अनेक आरोग्याशी निगडित असलेल्या समस्या कारणीभूत असतात. अनेकदा असे मानले जाते की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झालेला असतो. तो व्यक्ती खूप जोराने घोरतो. जोराने घोरल्यामुळे अनेकदा घरच्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जर तुमचा पार्टनर सुद्धा रात्री झोपल्यावर जोरजोरात घोरत असेल तर अशा वेळी त्याला बॉडी चेकअप करणे सांगायला पाहिजे.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

इतर बातम्या

आईसक्रीम खाल्ल्यावर अचानक डोके दुखतेय? मेंदू सुन्न होण्याच्या समस्यापासून करा अशा प्रकारे सुटका!

तुमच्या हातातील मोबाईलने होऊ शकतो घात, जाऊ शकते तुमची नोकरी!