मुंबईः आपल्यापैकी प्रत्येकाला आईस्क्रीम खाणे (ice-cream eating) आवडत असते. असा एखादा व्यक्ती असेल, जो आईस्क्रीम खात नसेल. बाजारामध्ये आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात. अनेकदा आपण जेवण झाल्यावर किंवा बाहेर फिरायला गेल्यावर आईस्क्रीम हमखास खात असतो. अनेकदा आइसक्रीम खाल्ल्यावर डोकेदुखी (Headache) जाणवू लागते. अशावेळी काही सेकंदासाठी किंवा मिनिटासाठी आपला मेंदू सुन्न( brain freeze) होऊन जातो परंतु अशा प्रकारचा त्रास आपल्याला का उद्भवतो ?,असा अनेकदा मनामध्ये प्रश्न सुद्धा निर्माण होतो. या समस्येवर तज्ञ मंडळी सांगतात की, ही काही वेळेसाठी जाणवणारी समस्या असते .