Multiple Sclerosis : मल्‍टीपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराचे प्रकार जाणून घ्या

Health Tips : मल्टिलपल स्क्लेरोसिस हा मेंदू आणि पाठीचा कण्यामध्ये होणारा आजार आहे. हा गंभीर स्वरुपाचा आजार असून यात मेंदू आणि पाठीचा कणा निकामी होतो. मुळात हा आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यावरच आपल्या लक्षात येतो. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

Multiple Sclerosis : मल्‍टीपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराचे प्रकार जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो (Image Credit Source: Pixabay)
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:17 PM

मुंबई : मल्टिपल स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis) हा आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. मुळात हा आजार बाहेरुन होणाऱ्या संसर्गातून होत नाही. हा आपल्या शरीरातच तयार होतो. हा आजार आपल्या मेंदू (brain) आणि पाठीच्या कण्यावर (Spinal cord) आघात करतो. जर कुटुंबामध्ये हा आजार कोणाला असल्यास आपण्यास हा आजार होण्याची शक्यता असते. तर जीवनसत्त्व डीची कमतरता असणाऱ्या व्यक्तीला हा आजार होण्याची अधिक शक्यता असते. मल्टिपल स्क्लेरोसिस हा ऑटोइम्यून आजार आहे. या आजारात आपली इम्यूयन सिस्टिम आपल्या विरोधात लढते. त्यामुळे मेंदू आणि पाठीच्या कण्यातील पेशींभोवती असलेल्या आवरणाला तडा जातो. ती नष्ट होते त्यामुळे मेंदू आणि पाठीचा कणा या आजारात निकामी होतो. मुळात हा आजार शेवटच्या टप्प्यात गेल्यावरच आपल्या लक्षात येतो. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. हा आजार किती प्रकारचा असतो ते आपण जाणून घेऊयात.

मल्टिपल स्क्लेरोसिसचे प्रकार

  1. रिलाप्सिंग आणि रेमिटिंग मल्टिपल स्क्लेरोसिस (RRMS) : मल्टिपल स्क्लेरोसिस या आजाराचा हा सर्वात पहिला टप्पा आहे. या टप्प्यात आजाराची लक्षणं फार काळ दिसून येत नाही तसंच ती कायमस्वरुपी राहत नाहीत. या टप्प्यात आजाराची लक्षणं अचानक आपल्या शरीरावर हल्ला करतात आणि अचानक गायब पण होतात. पण या टप्प्यात आजाराची लक्षणं काही काळांनी पुन्हा दिसून येतात.
  2. सेकंडरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस (SMS) : हा या आजाराचा दुसरा टप्पा आहे. मल्टिपल स्क्लेरोसिसची जशी लक्षणं वाढत जातात हा आजार गंभीर स्वरुप धारण करतो. या टप्प्यात लक्षणं दिसण्याचे दिवस कमी कमी होत जातात. आणि ही लक्षणं तीव्र होत जातात.
  3. प्रायमरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस (PPMS) : हा आजार दुर्मिळ असून याची लक्षणं गंभीर स्वरुपाच असतात. हा आजार जेव्हा कळतो तोपर्यंत त्या रुग्णाची प्रकृती खूप खराब झालेली असते. हा आजार अंतिम टप्प्यात आल्यावरच आपल्या लक्षात येतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती ही नियंत्रणाबाहेर गेलेली असते. मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या रुग्णामध्ये केवळ 10 टक्के रुग्णांच्या आजार हा प्राइमरी प्रोग्रेसिव्ह मल्टिपल स्क्लेरोसिस या टप्प्यात पोहोचतो.
  4. प्रोग्रेसिव्ह रिलेप्सिंग मल्टिपल स्क्लेरोसिस (PRMS) : हा टप्पा या आजारातील सर्वात गंभीर आणि धोकादायक आहे. हा आजार दुर्मिळ असला तरी ज्यांना हा आजार होतो त्यांची प्रकृती नियंत्रणाबाहेर गेलेली असते. या टप्प्यात उपचारही साथ देत नाही.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

संबंधित बातम्या

दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू इच्छिता? तर मग या सवयी आजच सोडा, होऊ शकते मोठे नुकसान

चेहऱ्यावरील निशाणाला ब्यूटी मार्क समजत होती “ही” महिला, पुढे जे घडले ते सर्वांना थक्क करणारे होते !

वजन कमी करायचंय?, तर ‘या’ पदार्थांसोबत करा कोरफडीचे सेवन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.