AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: मधुमेह असणाऱ्यांनी काजूचे सेवन करा; तुम्हाला मिळू शकतात हे फायदे

मधुमेह असणाऱ्यांना आपल्या खाण्यापिण्यावर नेहमीच नियत्रंण ठेवावे लागते. तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर काजू खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होतो.

Health Tips: मधुमेह असणाऱ्यांनी काजूचे सेवन करा; तुम्हाला मिळू शकतात हे फायदे
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 5:12 PM
Share

Health Tips:आजच्या काळात मधुमेह असणारे अनेक रुग्ण असतात, आणि त्याचा त्रास अनेक जणांना होतो आहे. आजच्या धक्काधक्कीच्या काळात कोणी ना कोणी रुग्ण मधुमेह (Diabetes) झालेला असतो, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनहेल्दी लाईफ (Unhealthy Life) स्टाईल. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो, त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त असते. आणि माणसाच्या शरीरात जर साखरेचे प्रमाण वाढले तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. तुमच्या शरीरातील जर साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवायचे असेल तर काजू खाणे तुमच्यासाठी फायजेशीर असते.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी काजू खाणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर आणि तेव्हा तुम्ही काजूचे सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातील साखरेवर नियंत्रण मिळवू शकता. त्यामुळे आम्ही तुम्हाला काजू खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

काजूमध्ये असणारे पोषक तत्व

तुम्ही जर काजू खात असाल तर तुम्हाला काजूमध्ये कोण कोणते पोषक तत्व असतात हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. काजू खात असाल तर काजूमध्ये फॉस्फोरस, मँग्निशिअम, प्रोटीन, फोलेट, आयरन, फायबर, अँटी ऑक्सिडेंट,विटामिन आणि मिनरल, सेलेनियमची मात्रा जास्त असते. त्यामुळे काजूला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या डायमटमध्ये काजूचा वापर करू शकता. असं म्हटलं जातं की, मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी काजू खाणे गरजेचे आहे.

काजूचे फायदे

मानवी शरीरात जर पॅन्क्रियाज, इन्सुलिन हामोर्न्स वाढले नाही तर माणस मधुमेहाची शिकार होतात. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले तर रुग्णांना भयंकर रोगांची लागण होण्याची शक्यता असते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले तर ब्रेन स्ट्रोक, मल्टिपल ऑर्गन फेल, किडनी खराब होऊ शकते किंवा ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो अशा घातक समस्या निर्माण होऊ शकतात. या परिस्थितीवर जर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे असेल तर तुमच्या खाण्यामध्ये काजूचे प्रमाण वाढवा, त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते.

ताण तणाव कमी होतो

आपल्या आहारात यासाठी काजू सांगतात की, काजूमुळे पोटॅशिअम, फायबर, विटामिन सी हे गुणांमुळे फायदा होत असतो. तुमच्या आहारात काजू असेल तर शरीरातील साखरेच प्रमाण कमी करण्यास मदत होते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास होतो, असे रुग्ण मानसिक तणावाखाली वावरत असतात. त्यामुळे अशा रुग्णांनी काजूचे सेवन केले पाहिजे. यामुळे इन्सुलिन वाढण्यासही मदत होते.

वजनावर नियंत्रण मिळवू शकता

मधुमेह असणाऱ्या लोकांचे जर वजन वाढले असेल तर त्यांनीही काजूचे सेवन केले पाहिजे. काजूचे सेवन करत असाल तर तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. काही लोकांचे असे मत असते की, काजू खाल्ल्यामुले वजन वाढू शकते. त्यामुळे हा लोकांचा भ्रम मनातून काढून टाकला पाहिजे. कारण काजूमध्ये मँग्नेशिअम, फायबर, कॉर्ब्स असते, यामुळे तुमचे वजन ते नियंत्रणात राहू शकते.

काजू एक फायदे अनेक

अनेक डायटीशियन मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराचे वेळपत्रक पाळायला सांगतो. मधुमेह असणाऱ्या लोकांना कमी मात्रा असलेले आणि जास्त फायदेशीर असा आहार खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ही गोष्ट खरी आहे की, काजूचे सेवन जर तुम्ही करत असाल तर शरीराला चांगल्याप्रकारची शक्ती मिळते. त्यातही जर तुम्ही रोज दोन ते चार काजू खात असाल तर शरीराला त्याचा नक्कीच फायदा मिळतो.

उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते

ज्या रुग्णाना उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी काजूचे सेवन केले तर त्यांना असलेला उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होऊ शकतो. त्याबरोबरच जे लोक नेहमी काजूचे सेवन करतात, त्यांची किडनीही चांगली राहते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांची इम्युनिटीही कमी झालेली असते, ती जर वाढवायची असेल तर काजू सगळ्यात जास्त फायदेशीर असते.

त्यामुळे दिवसांतून चार किंवा पाच काजूचे सेवन करा, आणि मधुमेहाचा अतित्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्यानुसारच तुम्ही काजूचे सेवन करा.

संबंधित बातम्या

Multiple Sclerosis : मल्‍टीपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराचे प्रकार जाणून घ्या

Health tips : मज्जातंतूच्या वेदनांवर ‘हे’ घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज

दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू इच्छिता? तर मग या सवयी आजच सोडा, होऊ शकते मोठे नुकसान

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.