तिसऱ्या लाटेच्या तुलनेत आताची रुग्णवाढ काय संकेत देतेय? तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचंय!

| Updated on: Jun 12, 2022 | 1:29 PM

सध्याची राज्यातील सर्व कोरोना परिस्थिती पाहता, राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आवटे म्हणाले की, राज्यात तिसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण कमी आहे. तसेच राज्यात पुढील काही दिवसात रुग्णसंख्या वाढून पुन्हा कमी होण्याची शक्यता देखील आहे. मात्र, असे असताना देखील टेस्टिंग वाढवणे, जिनोमिक सिक्वेंसिग करणे, जे बेड तयार करण्यात आलेत ते कार्यान्वित करणे गरजेचे.

तिसऱ्या लाटेच्या तुलनेत आताची रुग्णवाढ काय संकेत देतेय? तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचंय!
Follow us on

मुंबई : देशासह राज्यामध्येही कोरोना (Corona) रूग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसते आहे. यामुळे वाढती रूग्ण संख्या बघता परत एकदा लाॅकडाऊन लागण्याची भीती अनेकांनी व्यक्त केलीये. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 8582 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झालीये. तर राज्यामध्ये 2922 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीये. धोकादायक (Dangerous) गोष्ट म्हणजे कोरोना रूग्णांचा आकडा दररोज वाढतानाच दिसतोय. लग्न समारंभ आणि विविध सार्वजनिक कार्यक्रम यामुळे कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे देखील सांगितले जात आहे. देशातील कोणत्याही राज्यामध्ये अजून मास्क लावण्यासाठी सक्ती करण्यात आली नाहीये. मात्र, जर ही आकडेवारी अशीच वाढत राहिली तर निर्बंध लावण्याची भीती व्यक्त केली जातयं. राज्यामधील सर्वाधिक रूग्ण (Patients) हे सध्या मुंबईमध्ये आहेत.

डाॅ. प्रदीप आवटे म्हणाले की…

राज्यातील सर्व कोरोना परिस्थिती पाहता, राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आवटे म्हणाले की, राज्यात तिसऱ्या लाटेच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण कमी आहे. तसेच राज्यात पुढील काही दिवसात रुग्णसंख्या वाढून पुन्हा कमी होण्याची शक्यता देखील आहे. मात्र, असे असताना देखील टेस्टिंग वाढवणे, जिनोमिक सिक्वेंसिग करणे, जे बेड तयार करण्यात आलेत ते कार्यान्वित करणे गरजेचे. बी. ए 5 या व्हेरीयंटचा प्रसार होत असल्याने राज्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे देखील आवटे म्हणाले. पुढे बोलताना आवटे म्हणाले की, फक्त महाराष्ट्रच नाही तर इतरही राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ पाहायला मिळतीये. तसेच नागरिकांना सावध राहण्याची देखील गरज आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यामध्ये कोरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढतोय

राज्यामध्ये मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्हामध्येही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. मात्र, राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या म्हणण्यानुसार अजून रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे, परंतू परत रूग्ण संख्या कमी होईल. जूनचा दुसरा आठवडा संपत आलाय. राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मान्सूम दाखल झाला असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. यामुळे कोरोनासह, डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्णही वाढण्याची शक्यता आहे. ताप आणि सर्दी आली असेल तर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.