Lifestyle for Slow Ageing : लवकर म्हातारं दिसायचं नसेल तर 30 व्या वर्षानंतर ‘या’ पदार्थांपासून रहा दूर

वयाच्या 30 व्या वर्षानंतर मनुष्याच्या शरीरातील मेटाबॉलिज्म मंदावू लागते. अशा परिस्थितीमध्ये या वयानंतर लोकांनी कमी मीठ, कमी तेल-मसाले आणि कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. 30 व्या वर्षआनंतर खाण्यापिण्याच्या जुन्या सवयींमुळे आपण वेळेआधीच म्हातारे होऊ शकतो.

Lifestyle for Slow Ageing : लवकर म्हातारं दिसायचं नसेल तर 30 व्या वर्षानंतर 'या' पदार्थांपासून रहा दूर
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 11:22 AM

नवी दिल्ली – प्रत्येक दिवसागणिक आपलं वय वाढत असतं. 20 व्यावर्षी जसं वाटतं असतं तसंच तुम्हाला आत्ताही वाटू शकतं पण खरं हे आहे की 30 व्या वर्षानंतर (changes in body after 30) आपल्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात, ज्यामुळे तुम्हाला पहिल्यासारखं फिट राहणं (being fit)कठीण होऊ शकतं. त्यामुळेच वयाच्या 30 व्या वर्षानंतर तुमची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या (lifestyle and food habits) सवयींमध्ये काही चांगले बदल केल्यास वाढत्या वयामुळे काही त्रास होणार नाही.

आज आपण काही अशा पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे 30 व्या वर्षानंतर खाणे टाळणे चांगले ठरते.

फ्लेव्हर्ड दही आणि योगर्ट

हे सुद्धा वाचा

बऱ्याच वेळेस लोकं गोड पदार्थ खायचे नाहीत म्हणून मिठाई, आईस्क्रीम, कॅंडी, कुकीज असे पदार्थ खाणं बंद करतात. पण हे काही खरं नाही. खरंतर ब्रेड, केचअप आणि फ्लेव्हर्ड योगर्ट हे असे पदार्थ आहे जे गोड पदार्थांचे स्त्रोत आहेत. पण आपल्याला ते माहीत नसतं आणि आपण ते खात राहतो. फ्लेव्हर्ड योगर्टमध्ये एक कप आईस्क्रीम इतकी साखर असू शकते.

डबाबंद सूप

कोणत्याही व्यक्तीसाठी दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ धोकादायक ठरू शकते. सर्वांनी दिवसभरात 2300 ग्रॅमपेक्षा कमी सोडिअमचे सेवन करावे. हेल्दी आहे असा दावा करणाऱ्या कॅन्ड अथवा डबाबंद सुपाच्या एका सर्व्हिंगमध्ये दिवसभरातील 40 टक्के सोडिअम असते. त्यामुळे तुम्ही 2-3वेळा सूप प्यायल्यास शरीराच्या गरजेपेक्षा अधिक सोडिअम सेवन केले जाते, जे घातक ठरू शकते. एवढेच नव्हे तर सूपमध्ये बीपीए नावाचे केमिकल असते ते कॅन्सर, वंध्यत्व आणि वजन वाढण्याशी संबंधित आहे. त्यामुळे डबाबंद सूप पिण्यापेक्षा घरी ताजे सूप करून प्यावे.

कोल्ड ड्रिंक्स

कोल्ड ड्रिंकचे सेवन अतिशय घातक असते. त्यामध्ये कॅन्सरची निर्मिती करणाऱ्या रंगांचा (फूड कलर) वारक केला जातो. तसेच कोल्ड ड्रिंकमध्ये असलेली अतिरिक्त साखर हीदेखील शरीरासाठी खूप घातक असते.

कॉकटेल व बिअर

मद्यपान करणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी घातकच असते. आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जसं आपलं वय वाढतं तसे आपलं शरीर मद्य नीट पचवू शकण्याच्या दृष्टीने कमजोर अथवा अशक्त होते. त्यामुळे वाढत्या वयानुसार मद्यापासून लांब राहणेच उत्तम ठरते. मद्यपानामुळे शरीराचे अपरिमित नुकसान होते,

व्हाईट ब्रेड

अनेक जण सकाळी नाश्त्यासाठी व्हाईट ब्रेडचे सेवन करतात पण नियमितपणे त्याचे सेवन केल्यास वजन वाढते. त्यामध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते जे शरीरात चरबीच्या रुपात जमा होते. तसेच व्हाईट ब्रेडमुळे ब्लड शुगरही वाढते.

हाय सोडियमयुक्त चायनीज पदार्थ

बाजारात सहज उपलब्ध असणार्या चायनीज पदार्थांमध्ये खूप जास्त सोडिअम असते, ज्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होऊ शकते. तसेच आपले ब्लड प्रेशरही वाढू शकत. कोरड्या, निस्तेज त्वचेमुळे आपण वयाआधीत म्हातारे दिसू लागतो.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.