AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका

गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय कमी वयाच्या तरुणांना देखील हार्ट अटॅक येत आहे, जे खरंच चिंताजनक आहे... यासाठी कारणीभूत आहे, आपली जीवनशैली... काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन केल्यास आरोग्य उत्तम राहिल... सांगायचं झालं तर, काही चुकीच्या सकाळच्या सवयींमुळे तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचा धोका झपाट्याने वाढत आहे.

सकाळी उठताच करताय 'या' 4 चुका, सावध व्हा... वाढतोय 'हार्ट अटॅक'चा धोका
| Updated on: Jun 23, 2026 | 3:52 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात व्यक्ती कामाला अधिक आणि आरोग्याकडे कमी लक्ष देत आहे. पण त्यांना एक गोष्ट कळत नाही की, आरोग्य उत्तम असेल कर, सर्वकाही करता येतील. आजत्या धावपळीच्य जीवनात हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. अगदी तरुणांनाही हृदयविकारांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, हृदयविकारांचा धोका इतका का वाढत आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागील खरं कारण म्हणजं सकाळच्या काही नको त्या सवयी. आपल्या काही सवयी, ज्या आपल्याला अगदी सामान्य वाटतात, त्या हळूहळू आपल्या हृदयाला कमकुवत करत आहेत. विशेषतः सकाळी होणाऱ्या चुकांमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे.

सकाळी गाढ झोपेतून अचानक आणि दचकून जाग आल्याने शरीरातील ‘कॉर्टिसोल’ आणि ‘ॲड्रेनालाईन’ सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके अचानक वाढतात, ज्यामुळे हृदयावर खूप दबाव येतो. अशा वेळी, अलार्म वाजल्यानंतर 2 मिनिटे अंथरुणातच राहा, दीर्घ श्वास घ्या, शरीर ताणा आणि नंतर हळू हळू उभे राहा.

रिकाम्या पोटी ‘बेड-टी’ किंवा ‘कॉफी’ प्यायल्याने शरीरातील आम्लता वाढते आणि निर्जलीकरण होऊ शकते. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कॅफीन घेतल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो. सकाळी उठल्याबरोबर 1- 2 ग्लास कोमट पाणी प्या, जेणेकरून रात्रभर निर्जलीकरण झालेल्या अवयवांना ऑक्सिजन मिळू शकेल.

सकाळी उठल्याबरोबर वॉर्म-अप न करता जड वजन उचलणं किंवा उच्च-तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम सुरू करणं हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. सकाळी रक्त थोडे घट्ट असते, ज्यामुळे रक्तात अडथळा येण्याचा धोका वाढतो. अशा वेळी, व्यायाम सुरू करण्यापूर्वी किमान ५ ते १० मिनिटे हलका वॉर्म-अप किंवा स्ट्रेचिंग करणे खूप महत्त्वाचे आहे.

नाश्ता न केल्याने शरीराची चयापचय क्रिया मंदावते आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतात. तसेच, नाश्त्यामध्ये जास्त तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा अतिरिक्त साखर खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा