AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात ही फळं नक्की खा… पचनक्रिया राहील निरोगी

पावसाळ्यात अनेक फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचं महत्त्व आहे. डॉक्टर देखील कायम फळे खाण्याचा सल्ला देत असतात. पण अशी काही फळे आहेत, जी पावसाळ्यात खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहील...

पावसाळ्यात ही फळं नक्की खा... पचनक्रिया राहील निरोगी
| Updated on: Jul 04, 2026 | 3:48 PM
Share

ऋतूनुसार फळं बदलतात आणि त्याचा आपल्या शरीराला योग्य तो फायदा होतो. पावसाळ्यात अनेक फळे बाजारात येतात. प्रत्येक फळाचं महत्त्व आहे. पण पावसाळ्यात कोणती फळे खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहील याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पावसाळ्यात आहारात जांभूळ, पेरू, नाशपाती, आलुबुखारा आणि लिची यांसारख्या फळांचा समावेश करावा. याफळांमध्ये, फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असलेली ही मोसमी फळे पचनसंस्था निरोगी ठेवतात, बद्धकोष्ठतेपासून आराम देतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

जुलैच्या सुरुवातीच्या महिन्यांत म्हणजेच पावसाळ्यात येणारे जांभूळ फायबरने समृद्ध असल्यामुळे ते पचनासाठी फायदेशीर मानले जाते. त्याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या टाळता येतात. लोहाचा चांगला स्रोत असल्याने रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीही ते उपयुक्त मानले जाते, तसेच मधुमेही रुग्णांसाठीही हे एक उत्तम फळ आहे.

पेरू हे हिवाळ्यात तसेच पावसाळ्यात उपलब्ध असणारे फळ आहे. हे फायबरचा एक उत्तम स्रोत देखील आहे, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. लिंबूवर्गीय फळ संत्र्यापेक्षा पेरूमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. यामुळेच ते तुमची त्वचेपासून ते आजारांपर्यंतची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

पेरू प्रमाणेच, नाशपाती हे देखील हिवाळ्याव्यतिरिक्त पावसाळ्यातील फळ आहे. हे फायबरच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहे. त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळण्यास मदत होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ते चावून खाऊ शकता. यामुळे अवघ्या काही दिवसांत चांगले परिणाम दिसू शकतात.

आलूबुखार हे देखील उन्हाळा ते पावसाळ्यातील फळ आहे. जून ते ऑगस्ट या काळात येणारे हे फळ, सॉर्बिटॉलने समृद्ध असल्यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. हे दोन्ही पोषक घटक पचनक्रिया सुधारतात. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठीही आलूबुखार फायदेशीर आहे. याशिवाय, हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्यामुळे मोसमी आजारांपासून तुमचे संरक्षण करण्यास उपयुक्त ठरते.

लिची हे देखील एक फळ आहे जे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिन्यांत उपलब्ध होऊ लागते. हे रसाळ फळ शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते. याशिवाय, लिचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. हे पचायला हलके फळ असल्यामुळे, पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. पण आहात कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा