Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची …. ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे चांगले आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तो व्यायाम नेमका कधी करावा, त्याची योग्य वेळ कोणती याबाबत लोक संभ्रमात पडतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेळी धावणे चांगले आहे.

Weight Loss Tips : तू धाव पुढं गड्या तुला भीती कशाची .... ? वजन कमी करण्यासाठी कधी धावणे ठरते फायदेशीर ?
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 8:22 AM

नवी दिल्ली : वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोकं हे दिवसभरात बराचसा वेळ काढून व्यायाम (exercise) करतात. वर्कआऊट (workout) करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती असाही गोंधळ अनेक वेळा लोकांच्या मनात होत असतो. सकाळी धावल्याने वजन लवकर कमी होते किंवा संध्याकाळी धावणे फायदेशीर ठरते? व्यायामाची योग्य वेळ तुमच्या वजनावर (effect on weight) अनेक प्रकारे परिणाम करते. तर, कोणत्या वेळी तुम्ही वर्कआउट करून वजन लवकर कमी (weight loss) करू शकता, हे जाणून घेऊया.

कोणत्या वेळी तुम्ही धावून वजन लवकर कमी करू शकता ?

व्यायामाची पद्धत तुमचे वजन कमी करण्यावर अवलंबून असते, म्हणूनच वर्कआउट करण्याची योग्य वेळ जाणून घेणे हे खूप महत्वाचे आहे. सकाळी आठ वाजण्यापूर्वी धावण्याचे अनेक फायदे आहेत. धावणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि बराच काळ कोणत्याही रोगापासून दूर राहता येते. धावण्याचा आणखी एक फायदा असा आहे की, एकतर आपण बराच काळ तंदुरुस्त राहतो आणि या व्यायामासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे देखील खर्च करावे लागत नाही. कोणत्याही वयोगटातील कोणतीही व्यक्त सहज धावण्याचा व्यायाम करू शकते.

हे सुद्धा वाचा

सकाळी धावल्यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं. यासोबतच अशा वेळी धावल्याने हृदयाचे ठोके वाढतात, तसेच धावल्याने रात्री चांगली झोप लागते. तर संध्याकाळी शरीराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. चरबी कमी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ यापैकी दोन्ही वेळा चांगल्या असू शकतात. परंतु बहुतेक वर्कआउट्स करण्यासाठी, सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते.

व्यायामाच्या वेळेचा वजनावर होतो परिणाम

तसं पहायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जसा वेळ मिळेल तसा आपापल्या वेळेनुसार व्यायाम करतो. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने व्यायाम करता आणि ज्यावेळी व्यायाम करता, त्या दोन्हींचा तुमच्या वजनावर परिणाम होतो, हे फारच कमी लोकांना माहीत असेल. बर्‍याच लोकांना सकाळी लवकर उठता येत नाही, म्हणूनच ते संध्याकाळी धावतात. तसेच काही लोकांना असे वाटते की सकाळी लवकर उठल्यानंतर वर्कआउट करणे चांगले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यायाम करत असलात तरी सकाळी लवकर उठून व्यायाम करणे उत्तम मानले जाते. यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होतो जे तुम्हाला तणावापासून दूर ठेवते.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.