AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी की संध्याकाळी… कोणत्या वेळी सायकल चालवणे ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

आजच्या युगात फिटनेस हा फक्त एक पर्याय नाही तर ती एक गरज बनली आहे. अशा परिस्थितीत फिट राहण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम पर्याय आहे. काही लोकं फिटनेससाठी सायकलिंग देखील करतात. पण बऱ्याचदा काही लोक गोंधळलेले असतात की सायकलिंग कधी करावी? चला तर आजच्या लेखात जाणून घेऊयात सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्या वेळी सायकलिंग केल्याने जास्त फायदे मिळतात.

सकाळी की संध्याकाळी... कोणत्या वेळी सायकल चालवणे ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर
cycling and health
| Edited By: | Updated on: Jun 04, 2025 | 2:30 PM
Share

आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला दररोज व्यायाम करायला जमत नाही. सोप्या, स्वस्त आणि मजेदार व्यायामाच्या बाबतीत, सायकलिंग हा एक उत्तम पर्याय आहे. सायकल चालवल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यात स्मरणशक्ती सुधारण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत अनेक फायदे आहे. हे केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर हाडे मजबूत करते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि मानसिक ताण कमी करते. तर सायकलिंगची योग्य वेळ तुमच्या गरजेवर अवलंबून असते. पण बऱ्याचदा लोकं गोंधळलेले असतात की सायकलिंग कधी करावी? सायकलिंगची योग्य वेळ कोणती आहे? चला तर मग आजच्या लेखात आपण सायकलिंग करण्याचे फायदे आणि त्यांची योग्य वेळ कोणती ती जाणून घेऊयात…

सकाळी सायकलिंग करण्याचे फायदे

सकाळी सायकलिंगबद्दल बोलायचे झाले तर सकाळी वातावरणात फ्रेश हवा आणि ऑक्सिजन असते. सकाळचे वातावरण सर्वात शुद्ध मानले जाते. तसेच सकाळच्या वेळेस कमी रहदारी असते आणि प्रदूषण खूप कमी असते. यावेळी सायकलिंग करणे फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी सायकलिंग केल्याने शरीरात एंडोर्फिन नावाचा हार्मोन बाहेर पडतो, जो मूड सुधारतो आणि तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवतो.

यासोबतच जर तुम्ही सकाळी सायकलिंग केले तर ते चयापचय वाढवण्यास देखील मदत करते. सकाळी लवकर व्यायाम केल्याने, संपूर्ण दिवसासाठी कॅलरीज बर्न करण्याची शरीराची क्षमता वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच हा वेळ पूर्णपणे मोकळा असतो. कोणत्याही आवाजाशिवाय शांत वातावरणात सायकलिंग केल्याने मन शांत होते आणि एकाग्र होण्याची क्षमता वाढते.

संध्याकाळी सायकलिंग करण्याचे फायदे

संध्याकाळी सायकलिंगचे स्वतःचे फायदे देखील आहेत. तुम्ही दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी शरीर आधीच सक्रिय असते, ज्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता वाढते आणि दुखापतीचा धोका कमी होतो. तसेच, ऑफिस किंवा अभ्यासानंतर सायकलिंग एक प्रकारचा ताण कमी करणारा ठरू शकतो, ज्यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि मूड सुधारतो.

संध्याकाळी हलकी सायकलिंग केल्याने शरीराला आराम मिळतो आणि रात्रीची झोप चांगली लागते. विशेषतः उन्हाळ्यात संध्याकाळी हवामान सकाळच्या तुलनेत थोडे थंड असते, ज्यामुळे सायकलिंग अधिक आरामदायी होते. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत घालवता येतो. एकत्र सायकलिंग करणे ही एक निरोगी सामाजिक क्रिया बनते.

अशा परिस्थितीत, तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही सायकल चालवू शकता. ते तुमच्या गरजेवर अवलंबून असते. जर तुमचे वजन कमी करणे, दिवसभर ऊर्जा मिळवणे आणि मानसिक एकाग्रता वाढवणे असेल तर सकाळची वेळ चांगली असते. दुसरीकडे, जर तुम्हाला तणावातून आराम, शारीरिक थकवा दूर करणे आणि सामाजिक सहभाग हवा असेल तर संध्याकाळी सायकल चालवणे फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.