AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : शहरी मुलांमध्ये मायोपिया आजारामध्ये होतेय वाढ, वेळीच व्हा सावध अन् घ्या काळजी!

भारतातील 5-15 या वयोगटातील सर्व शहरी मुलांपैकी एक तृतीयांश मुलांना 2030 पर्यंत मायोपियाचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे मुंबईतील डॉ. अगरवाल्ज आय हॉस्पिटलच्या नेत्रचिकित्सकांनी सध्या सुरू असलेल्या मायोपिया जागरूकता सप्ताहात सांगितले आहे. 2050 पर्यंत, देशातील दर दोन मुलांपैकी एक मूल मायोपिक असेल, असे भाकितही त्यांनी चालू असलेल्या ट्रेंडच्या आधारे केले आहे. सन 1999 ते 2019 या 20 वर्षांच्या कालावधीत, शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण भारतात अनुक्रमे 4.44% वरून 21.15% पर्यंत तिप्पट झाले आहे. याबाबत डॉ. स्मित एम बावरिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Health : शहरी मुलांमध्ये मायोपिया आजारामध्ये होतेय वाढ, वेळीच व्हा सावध अन् घ्या काळजी!
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 5:41 PM

गेल्या काही वर्षांपासून शहरी मुलांमध्ये मायोपियाच्या आजारामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे आपण पाहत आहोत. 20 वर्षांखालील सुमारे 120,000 मायोपिक रुग्ण दरवर्षी भारतभर डॉ. अग्रवाल यांच्या नेत्र रुग्णालयात भेट देतात. 5 ते 15 वर्षे वयोगटातील शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण 1999 मध्ये 4.4% वरून 2019 मध्ये 21.1% पर्यंत वाढलं आहे.

दरवर्षी 0.8% च्या प्रमाणानुसार आधारित आमचे अंदाज, शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण वाढेल असे सूचित करतात. 2030 मध्ये 31.89%, 2040 मध्ये 40% आणि 2050 मध्ये 48.1%. याचा अर्थ असा आहे की भारतातील प्रत्येक दोन मुलांपैकी एक बालक येत्या 25 वर्षात मायोपियाने ग्रस्त असेल, सध्याच्या चारपैकी एकाला मायोपिया असण्याच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण जास्त असल्याचं डॉ. स्मित एम बावरिया यांनी सांगितलं.

मायोपिया वाढण्याची कारणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बैठी जीवनशैली, दीर्घकाळ स्क्रीनचा वापर आणि कमी बाह्य क्रियाकलाप यामुळे मुलांमध्ये मायोपियाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होते आहे. ते म्हणालेः “या वाढत्या समस्येची मूळ कारणे बहुआयामी आहेत. स्क्रीनवरील अधिक वेळ मुलांच्या डोळे, रेटिना आणि मेंदूला उत्तेजित करतो. ज्यामुळे बुबुळाच्या जलद वाढीमुळे मायोपिक बदलांना गती मिळते. याव्यतिरिक्त, घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरणे नसल्याने मुलांना डोळ्यांच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असलेला नैसर्गिक प्रकाश मिळू शकत नाही.

रुग्णांचा वयोगटही आता गेल्या काही वर्षांमध्ये बदलताना दिसून येतोय. डोळ्यांच्या तपासणीसाठी लहान मुलं वारंवार येत असल्याचं दिसत आहे. त्यातील अधिकाधिक मुलांना मायोपिया असल्याचं दिसत आहे. आम्ही सध्या 5 ते 17 वयोगटातील शालेय मुलांमध्ये मायोपिया असल्याची अनेक उदाहरणं पाहात आहोत. 2017 मध्ये, मुंबईतील शहरी झोपडपट्टी भागातील 3-15 वयोगटातील 1,000 मुलांचे सर्वेक्षण, 200 मुलांना मायोपिया असल्याचे आढळून आल्याचं डॉ. स्मित एम बावरिया म्हणाले.

मायोपिया आजाराची लक्षणे

मुलांमध्ये मायोपियाची लक्षणे ओळखून वैद्यकीयदृष्ट्या झटपट हालचाल करणे महत्वाचे आहे. लक्षणांमध्ये अस्पष्ट दृष्टी, दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण, डोळ्यांवरील ताण, डोकेदुखी आणि थकवा विशेषतः दीर्घकाळ स्क्रीन वापरल्यानंतर यांचा समावेश होतो. ही स्थिती बरी होऊ शकत नसली तरी चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने फरक पडू शकतो.

वयाच्या 19 वर्षांनंतर लेझर दृष्टी सुधारणा उपचार देखील निवडला जाऊ शकतो. परंतु डोळ्यांची नियमित तपासणी करणे, स्क्रीनवरील वेळेचा समतोल राखण्यासाठी मुलांना घराबाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशात क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करणे आणि मायोपियाची पुढील प्रगती मंदावण्यासाठी एट्रोपीन आय ड्रॉप्स किंवा मायोपिया कंट्रोल ग्लासेस सारख्या वैद्यकीय हस्तक्षेपांचा विचार करणे महत्वाचे आहे.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.