Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 11 हजारांनी घट, तीन महिन्यांनी आकडे 42 हजाराच्या घरात

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 167 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 81 हजार 839 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 11 हजारांनी घट, तीन महिन्यांनी आकडे 42 हजाराच्या घरात
CORONA
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 9:51 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 11 हजारांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 91 दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 43 हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात 42 हजार 640 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 167 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. (New 42640 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 640 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 167 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 81 हजार 839 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 99 लाख 77 हजार 861 वर गेला आहे. देशात 2 कोटी 89 लाख 26 हजार 38 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 89 हजार 302 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 62 हजार 521 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 28 कोटी 87 लाख 66 हजार 201 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,640

देशात 24 तासात डिस्चार्ज – 81,839

देशात 24 तासात मृत्यू –1,167

एकूण रूग्ण –  2,99,77,861

एकूण डिस्चार्ज –2,89,26,038

एकूण मृत्यू – 3,89,302

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 6,62,521

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 28,87,66,201

संबंधित बातम्या :

आरोग्य यंत्रणेनं करुन दाखवलं, दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम

महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

(New 42640 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.