Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला

गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 542 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये किंचीत वाढ, कोरोनाबळींचा आकडा मात्र घटला
Corona
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 9:27 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत दोन हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 62 हजार 224 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 2 हजार 542 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने दिलासाही आहे (New 62224 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 542 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 7 हजार 628 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 वर गेला आहे. देशात 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 79 हजार 573 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 8 लाख 65 हजार 432 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 26 कोटी 19 लाख 72 हजार 14 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासात 28 लाख 458 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 62,224

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,07,628

देशात 24 तासात मृत्यू – 2542

एकूण रूग्ण –  2,96,33,105

एकूण डिस्चार्ज – 2,83,88,100

एकूण मृत्यू – 3,79,573

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 8,65,432

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 26,19,72,014 गेल्या 24 तासात लसीकरण – 28,00,458

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

Pune 3D Mask | पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क

(New 62224 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.