Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र निचांकी

गेल्या 24 तासात भारतात 67 हजार 208 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 330 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, सक्रिय रुग्णसंख्या मात्र निचांकी
Corona
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:46 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 67 हजार 208 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 2 हजार 330 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने दिलासाही आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या गेल्या 71 दिवसांतील निचांकी आकड्यावर आहे. 8 लाख 26 हजार 740 इतके सध्या अॅक्टिव्ह कोरानाग्रस्त आहेत. (New 67208 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 67 हजार 208 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 330 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 3 हजार 570 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 97 लाख 313 वर गेला आहे. देशात 2 कोटी 84 लाख 91 हजार 670 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 903 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 8 लाख 26 हजार 740 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 26 कोटी 19 लाख 72 हजार 14 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या 24 तासात 28 लाख 458 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 67,208

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,03,570

देशात 24 तासात मृत्यू –2,330

एकूण रूग्ण –  2,97,00,313

एकूण डिस्चार्ज –2,84,91,670

एकूण मृत्यू – 3,81,903

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 8,26,740

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 26,55,19,251

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, खेळाडू आणि नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

Pune 3D Mask | पुण्याच्या स्टार्टअप कंपनीने बनवला 3D प्रिंटिंग मास्क

(New 67208 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.