कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे डोळे होतायत खराब, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम! वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या संसर्गामुळे देशभरात कहर माजला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे सुमारे 2 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. 2020च्या तुलनेत 2021मध्ये कोरोनाची लाट अधिक उग्र रूप धारण करून आली आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे डोळे होतायत खराब, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम! वाचा तज्ज्ञ काय म्हणतात...
पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा!
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 2:35 PM

मुंबई : कोरोना विषाणूच्या (Corona Virus) वाढत्या संसर्गामुळे देशभरात कहर माजला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे सुमारे 2 लाख नवीन रुग्ण आढळले आहेत. 2020च्या तुलनेत 2021मध्ये कोरोनाची लाट अधिक उग्र रूप धारण करून आली आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तर, दुसरीकडे या विषाणूला बळी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे (New Strain of corona affecting on eyes and ears).

कोरोना विषाणूची नवीन लक्षणे

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या वेळी कोरोना विषाणूचा संसर्ग कान आणि डोळ्यांच्या क्षमतेवर थेट हल्ला करत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकारात या वेळी विषाणूजन्य ताप, ओटीपोटात वेदना, अतिसार, अपचन, गॅस, उलट्या, अतिसार, भूक न लागणे, शरीरदुखी आणि आम्लपित्त अशी लक्षणे दिसली. परंतु, संसर्ग वाढल्यानंतर कोरोनाची आणखी काही नवी लक्षणेही समोर आली आहेत.

कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, एसजीपीजीआय आणि केजीएमयूसह बर्‍याच कोव्हिड हॉस्पिटलमध्ये, कोरोनामुळे दाखल झालेल्या रूग्णांमध्ये पाहण्याची आणि ऐकण्याची समस्या वाढली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, येथे असे बरेच रुग्ण आहेत, ज्यांना दोन्ही कानांनी ऐकणे कमी झाले आहेत. याशिवाय कमी दिसत नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा गंभीर परिस्थिती उद्भवते तेव्हा कोरोना विषाणू शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करतो.

कोरोनाच्या नवीन प्रकारासंबंधित दिलासादायक काय?

तज्ज्ञ पुढे म्हणाले की, कोरोनाने ज्या प्रकारे आपले स्वरूप बदलले आहे, त्यानंतर चिंता अधिकच वाढली आहे. यावर कोरोनाच्या प्रोटोकॉलचे अनुसरण करणे हा एकच उपाय आहे. तथापि, नवीन प्रकारात दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा हा नवीन प्रकार प्रतिकारशक्ती चांगली असलेल्या रुग्णाला जास्त काळ त्रास देत नाही. असे रुग्ण 5-6 दिवसात बरे होतात (New Strain of corona affecting on eyes and ears).

लखनऊ येथील आरएमएल हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विक्रम सिंह म्हणाले की, कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे लोक आजारी पडत आहे. रुग्ण उलट्या, अतिसार, गॅस, अपचन, आम्लपित्त, शरीरावर वेदना, शरीरात जडपणा येणे आणि ऐकण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.

1 मिनिटात संसर्ग

एनबीटीच्या रिपोर्टनुसार, दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टरांनी संसर्गाबाबतची माहिती दिली. त्यांच्या मते कोरोनाचा सध्याचा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. रुग्णाच्या संपर्कात येतच अल्पावधित म्हणजे केवळ 1 मिनिटात तो दुसऱ्याला बाधित करतो.

मागील वर्षी जी कोरोनाची लाट होती, त्यावेळी असा प्रकार नव्हता. मात्र यावेळी जी लाट आलेली आहे ती अत्यंत धोकादायक आणि शक्तीशाली आहे. पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर संसर्ग होण्यासाठी किमान 10 मिनिटे लागत होते. मात्र यावेळच्या लाटेत हा अवधी घसरुन 1 मिनिटावर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे 30 ते 40 या वयोगटातील तरुणांना सर्वाधिक संसर्ग होत आहे. त्याचं कारणही साहजिक आहे, ते म्हणजे हाच वर्ग सर्वाधिक घराबाहेर असतो.

संपूर्ण कुटुंबाला बाधा

जर घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, तर सध्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना आपल्या कवेत घेतो. कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. आधी कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र आता रुग्णांना उलटी आणि जुलाब होत आहेत. इतकंच नाही तर काहींना त्वचेवर लाल चट्टेही उमटत आहेत.

(New Strain of corona affecting on eyes and ears)

हेही वाचा :

EXCLUSIVE : कोरोना कधी संपणार? कसा संपणार? काय करावं? अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसेंची सोपी उत्तरं

तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.