कोरोना लसीचा अनोखा फायदा, इतर आजारामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण घटलं, नवी माहिती समोर

कोरोना विषाणू महामारीचा सामना करण्यासाठी जगभरातील विविध देशांनी कोरोना प्रतिबंधक लसींचं संशोधन करुन निर्मिती केली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवण्यात आला.

कोरोना लसीचा अनोखा फायदा, इतर आजारामुळं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण घटलं, नवी माहिती समोर
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 11:24 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणू महामारीचा सामना करण्यासाठी जगभरातील विविध देशांनी कोरोना प्रतिबंधक लसींचं संशोधन करुन निर्मिती केली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवण्यात आला. कोरोना लसीकरणाचा फायदा आता दिसून येत आहे. कोरोना लसीकरणाच्या अभ्यासातून आता नवी बाब समोर आली आहे. कोरोना लस गंभीर आजार कमी करते आणि रोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी देखील काम करते. पण, त्याचा कोरोना व्यतिरिक्त इतर कारणांमुळे मृत्यूदरावरही परिणाम होतो का? यासंदर्भात नवं संशोधन समोर आलं आहे. लस घेतलेल्या लोकांच्या इतर आजारामुंळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी होतं.

कैसर परमानेंट यांनी केलेल्या या अभ्यासाची नोंद अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) मृत्यू दर साप्ताहिक अहवालात करण्यात आली आहे. 14 डिसेंबर, 2020 ते 31 जुलै, 2021 पर्यंत अमेरिकेत 6.4 दशलक्ष लसीकरण झालेल्या लोकांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य रेकॉर्डच्या संशोधकांनी, समान लोकसंख्याशास्त्र आणि भौगोलिक स्थाने असलेल्या 4.6 दशलक्ष कोरोना लस न घेतलेल्या लोकांच्या अभ्यासातून ही बाब समोर आणली आहे.

अमेरिकेच्या या तीन लसींवर अभ्यास

अमेरिकेत फायझर (Pfizer),मॉडर्ना (Moderna) आणि जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपन्यांकडून कोरोना लस बसवण्यात येत आहे.फायझर आणि मॉ़डर्ना लसींना संपूर्ण लसीकरणासाठी 2 डोसची आवश्यकता असते, तर जॉन्सन आणि जॉन्सनचा अॅडेनोव्हायरल व्हेक्टर लसीला फक्त एक डोस आवश्यक असतो.

ज्या व्यक्तींनी फायझर लस घेतली होती त्यांना पहिल्या डोसनंतर दर हजार लोकांमागे मृत्यूचं प्रमाण 4.2 आणि दुसऱ्या डोसनंतर 3.5 होते. तर ज्यांना लस मिळाली नाही त्यांच्यामध्ये 11.1 मृत्यू दर नोंदवला गेला होता.

ज्यांना मॉडर्ना लस मिळाली, त्यांच्यामध्ये पहिल्या डोस नंतरव एक हजार लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 3.7 आणि दुसऱ्या नंतर 3.4 मृत्यू होते. ज्यांना लस मिळाली नाही त्यांचा मृत्यू दर 1000 लोकांपैकी 11.1 होता. त्याच वेळी, जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतलेल्या प्रति 1,000 लोकांमध्ये 8.4 मृत्यू झाले, तर लसीकरण नसलेल्या गटातील 14.7 च्या तुलनेत.

इतर बातम्या:

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

‘देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा’, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

New Study claimed corona vaccinated people even non Covid mortality found lower than among unvaccinated corona vaccine in America

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.