Oral Health Summit 2024 : मौखिक आरोग्याची कशी घ्यावी काळजी, ऐका तज्ज्ञ काय सांगतात ?

Oral Health Summit 2024 : मौखिक आरोग्याबद्दल (Oral hygiene) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतून टीव्ही9 नेटवर्क आणि सेंसोडाइनच्या वतीने ओरल हेल्थ समिट 2024 चे आयोजित करण्यात येत आहे.

Oral Health Summit 2024 : मौखिक आरोग्याची कशी घ्यावी काळजी, ऐका तज्ज्ञ काय सांगतात ?
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 1:22 PM

Oral Health Summit 2024 : 2023 साली झालेल्या ओरल हेल्थ समिटच्या पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर, मौखिक आरोग्याबद्दल, मौखिक स्वच्छतेबद्दल (Oral hygiene) जागरूकता निर्माण करण्यासाठी TV9 नेटवर्क आणि Sensodyne पुन्हा एकत्र आले आहेत. 20 मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन असून, त्यानिमित्ताने लोकांना मौखिक आरोग्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचे (#TakeTheFirstStep) आवाहन करणारा एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या दंत कर्तव्याचे पालन करण्यास उद्युक्त करणारे हे कॅम्पेन असून ओरल हेल्थ समिटची ही दुसरी आवृत्ती आहे. डेंटल सायन्स क्षेत्रातील विविध तज्ज्ञ आणि मान्यवर हे सर्व वयोगटातील लोकांना सतावणाऱ्या मौखिक आरोग्याच्या समस्यांबद्दल चर्चा करणार आहेत.

“ कोविडनंतरच्या काळात जगभरातील लोक हे आपले आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देताना दिसत आहे. पण आपले मौखिक आरोग्य हे सर्वात महत्वाचे असते, कारण त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर आणि आरोग्यावर परिणाम होत असतो. हेच लक्षात घेऊन (मौखिक आरोग्याबद्दल) जागरूकता पसरवण्यासाठी आणि लोकांना तोंडाच्या स्वच्छतेच्या दिशेने सक्षम करण्यासाठी TV9 नेटवर्कने Sensodyne सोबत भागीदारी केली आहे,” असे TV9 नेटवर्कचे चीफ ग्रोथ ऑफीसर रक्तीम दास म्हणाले.

या उपक्रमाविषयी TV9 नेटवर्कचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित त्रिपाठी यांनीही अधिक माहिती दिली. “ सर्व वयोगटातील लोकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी मुळात त्यांचे मौखिक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे.  आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचून मौखिक आरोग्याबद्दल संवेदनशीलता बाळगण्याचा मेसेज देण्यासाठी 7 भाषांमध्ये विस्तारलेले TV9 नेटवर्क हे Sensodyne च्या मदतीसाठी सज्ज आहे. डिजिटल आणि ब्रॉडकास्टमध्ये प्रसारमाध्यमांच्या विस्तारासह, आम्ही अनेक भाषांमध्ये जागरूकता पसरवत आहोत.” असं TV9 नेटवर्कचे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर अमित त्रिपाठी म्हणाले.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग, इंडियन डेंटल असोसिएशन, नॅशनल ओरल हेल्थ फोरम आणि डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रमुख सदस्य हे दंत आरोग्य आणि विज्ञान या विषयावर त्यांचे मौल्यवान विचार या उपक्रमात शेअर करतील.

“टीव्ही 9 च्या ओरल हेल्थ समिटसोबत सलग दुसऱ्या वर्षी आमची भागीदारी कायम ठेवणे ही एक मानाची बाब आहे. दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी वचनबद्ध संस्था म्हणून, आम्ही या महत्त्वपूर्ण उपक्रमाला अभिमानाने समर्थन देतो. आणि आमच्या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल, सरकार, सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि डेंटल फोरमच्या प्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील सर्व भागधारकांचे आभार मानतो.

#BeSensitiveToOralHealth या Sensodyne च्या नवीन कॅम्पेनची जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त सुरुवात झाली. मौखिक आरोग्याबद्दल साक्षरता वाढवणे आणि देशभरात मोफत डेंटल कन्सलटेशन करून टाळता येण्याजोग्या तोंडी आरोग्य समस्या हाताळण्याचा आमचा अजेंडा पुढे नेत आहोत,” असे हॅलेऑनचे इंडियन सब-कॉन्टिनेंटचे एरिआ जनरल मॅनेजनर श्री नवनीत सलुजा म्हणाले.

जागतिक मौखिक आरोग्य दिनाच्या दिवशी, अर्थात 20 मार्च 2024 रोजी TV9 नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर समिटचे हायलाइट्स प्रसारित केले जातील.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.