Patanjali: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेव यांनी सांगितला रामबाण इलाज, सहज सोप्पा उपाय
बाबा रामदेव यांनी त्यांच्या योग आणि आयुर्वेदाच्या ज्ञानासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आयुर्वेदाचे फायदे सांगितले आहेत. यावेळी त्यांनी वात,पित्त आणि कफ नियंत्रणात आणण्याचा उपाय सांगितला आहे.

बाबा रामदेश पतंजलीच्या द्वारे घरोघरी आयुर्वेदाचे महत्व आणि पुरातन उपचार पद्धती पोहचवत आहेत. बाबा रामदेव केवल त्यांच्या पतंजलीच्या प्रोडक्ट्सच नाही तर शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करण्याचे आयुर्वेदिक उपाय सांगत आहेत. ते त्यांच्या सोशल मीडियावर खूपच एक्टीव्ह असतात. येथे बाबा रामदेव उपाय आणि आपले व्हिडीओ शेअर करत असतात. यावेळी बाबा रामदेव यांनी वात, पित्त आणि कफ दोष दूर करण्याचा रामबाण इलाज सांगितला आहे.
आज काल धावपळीचे जीवन आणि निकृष्ट जेवण यामुळे शरीरात अनेक समस्या तयार होत आहेत. यामुळे शरीरात तीन प्रमुख दोष तयार होत आहेत. वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडले जाते. याचे संतुलन बिघडल्यानंतर शरीरात वेगवेगळे आजारांची सुरुवात होते. चला तर पाहूयात बाबा रामदेव यांच्याकडून जाणून घेऊयात की वात-पित्त आणि कफदोष संतुलित करण्याचा रामबाण उपाय
बाबा रामदेव यांचा रामबाण इलाज काय ?
आयुर्वेदानुसार आपल्या शरीरात तीन प्रमुख दोष असतात. वात, पित्त आणि कफ. बाबा रामदेव यांच्यामते शरीरातील दोषांचे संतुलन कायम ठेवणे आजारापासून वाचण्याचाच उपाय नसून दीर्घायुष्य आणि मानसिक शांततेसाठी देखील गरजेचे असते. यासाठी बाबा रामदेव यांनी काही नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. ते खालील प्रकारचे आहेत.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
किडनीची समस्या असणारे
बाबा रामदेव यांच्या मते जर कोणाला किडनीशी संबंधित समस्या असेल तर त्याने दूधीची भाजी खाल्ली तर त्याला लाभ मिळू शकतो. दूधी किडनी फंक्शन दुरुस्त करण्यास मदत करते. वास्तविक दूधीत विटामिन सी, विटामिन बी1 पासून अनेक विटामिन आढळतात. याशिवाय जवाच्या पिठाची रोटी देखील किडनी रोग्यासाठी चांगली असते. कारण जवात फायबर मोठ्या प्रमाणात असते. शरीरातील टॉक्सिन काढण्यात ते मदत करते.
शुगर कंट्रोल करण्यासाठी
बाबा रामदेव यांनी सांगितले की शुगर कंट्रोल करायचे असेल तर अर्जून की छाल ( ऐनाचे झाड )सोबत दालचिनीचे सेवन करणे फायदेशीर असते. यामुळे शुगर कंट्रोल तर होईलच शिवाय हार्ट देखील हेल्दी राहील. तर न शिजवलेले पदार्थ खाल्ल्याने देखील शुगर लेव्हल आणि हार्टला हेल्दी बनवण्यास मदत मिळते.
सायनस आणि अस्थमा
सायनस आणि अस्थमासाठी देखील बाबा रामदेव यांनी एक पंतजलीचे प्रोडक्ट सांगितले. त्यांच्यामते जर कोणाला सायनस आणि अस्थमाचा त्रास असेल तर ते अणु तेल टाकू शकतात.
