पतंजलीची रेनोग्रिट टॅबलेट किडनीवर रामबाण, असा होतोय फायदा; रिसर्चमध्ये मोठा दावा

आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या पतंजलीच्या मानात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. पतंजलीने तयार केलेले रेनोग्रिट औषध किडनीच्या आजारासाठी रामबाण उपाय ठरलं आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध जर्नल नेचर जर्नलने हा दावा केला असून तसं रिसर्चही छापून आलं आहे.

पतंजलीची रेनोग्रिट टॅबलेट किडनीवर रामबाण, असा होतोय फायदा; रिसर्चमध्ये मोठा दावा
Patanjali Divya
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 5:14 PM

पतंजलीने तयार केलेली रेनोग्रिट टॅबलेट किडनीच्या आजारासाठी प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. या औषधाच्या परिणामांची माहिती नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाली आहे. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय ही दवा किडनीचे आजार बरे करत असल्याचं या नेचर जर्नलच्या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. रेनोग्रिट केवळ कॅन्सलच्या अॅलिओपॅथिक औषधांनी खराब झालेली किडनीच बरी करत नाही तर किडनीच्या सेल्सवर पडलेला परिणामही कमी करते. किडनीच्या गंभीर आजारावरही ही टॅबलेट परिणाम कारक आहे. त्याचा शरीरावर काहीच साईड इफेक्ट पडत नाही.

रिसर्चच्या दाव्यानुसार, या औषधाने शरीराची सूजही कमी होते. किडनीची कार्यप्रणालीही या औषधाने चांगली होते. तसेच किडनीचं नॅचरल आरोग्य कायम राखण्यासाठीही हे औषध अत्यंत उपयोगी आहे. तसेच या औषधामुळे किडनीशी संबंधित सर्व आजार रोखणं शक्य असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. हे औषध पूर्णपणे जडीबुटींपासून तयार करण्यात आलेलं आहे. त्यात पाषाणबेद, पलाश, वरुण, पुनर्नवामूलकासनी आणि गोखरूचं मिश्रण आहे.

वैश्विस स्तरावर मान्यता

नेचर जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्स जगातील पाचवं सर्वाधिक प्रतिष्ठीत जर्नल आहे. कोणत्याही साईड इफेक्टशिवाय पतंजलीच्या औषधाने किडनीचे आजार बरे होत असल्याचं हे या रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. किडनीवर दुसऱ्या औषधांमुळे होणारे साईड इफेक्टही या औषधाने कमी होत आहे. पतंजलीच्या या औषधाने किडनी फंक्शनही चांगलं राहतं. त्यामुळे किडनी आपलं काम अत्यंत व्यवस्थितपणे करते. तसेच शरीरातील खतरनाक टॉक्सिन काढण्याचं कामही हे औषध करतं. रिनोग्रिट खाल्ल्याने शरीरातील कोणत्याही भागाला कोणताही साईड इफेक्ट होत नसल्याचं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

आयुर्वेदाला मिळाली नवीन ओळख

नेचर जर्नल सायंटिफिकच्या रिपोर्ट्सवर आचार्य बालकृष्णन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिनोग्रिटचं हे यश अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आयुर्वेद हे वैज्ञानिकच असल्याचं वैश्विक स्तरावर मान्य होण्यास महत्त्वाची मदत झाली आहे. रिनोग्रिट किडनीच्या गंभीर आजारावरही प्रभावी आहे, हा केवळ माझा दावा नाहीये. तर अमेरिकेतील प्रसिद्ध शोध पत्रिका नेचर जर्नलचा दावा आहे, असंही ते म्हणाले. रिसर्चची लिंक क्लिक करा… https://www.nature.com/articles/s41598-024-69797-3