AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pilates exercises : करीना कपूर, जान्हवी कपूर सारखे फीट दिसायचे असेल तर; रोज करा हे ‘वर्कआऊट’ वाढत्या वजनावर मिळवता येते नियंत्रण!

Pilates exercises: करीना कपूर, जान्हवी कपूरसह अनेक बॉलिवूड अभिनेत्री वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘पिलेट्स वर्कआउट’ करतात. ही कसरत ४५ मिनिटांची आहे. या वर्कआउटमध्ये मांड्या आणि पायांसह कमरेच्या खालच्या भागांवर जास्त लक्ष दिले जाते.

Pilates exercises : करीना कपूर, जान्हवी कपूर सारखे फीट दिसायचे असेल तर; रोज करा हे ‘वर्कआऊट’ वाढत्या वजनावर मिळवता येते नियंत्रण!
करीना कपूर, जान्हवी कपूर सारखे फीट दिसायचे असेल तर; रोज करा हे ‘वर्कआऊट’ वाढत्या वजनावर मिळवता येते नियंत्रण!Image Credit source: social media
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 01, 2022 | 9:24 PM
Share

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक डाएटिंग आणि व्यायामाचा अवलंब (Adoption of exercise) करतात. मात्र, जंक फूडचे सेवन आणि जास्त विश्रांती यामुळे वजन वाढते. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅलरी काउंट (Calorie count) आवश्यक आहे. कॅलरीज वाढण्याच्या प्रमाणात कॅलरी बर्न करणे महत्वाचे आहे. यासाठी शुगर आणि ‘कार्ब्स फ्री डाएट’ (Carb free diet) घ्या आणि रोज वर्कआउट करा. तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल, तर दररोज Pilates व्यायाम करा.आजकाल Pilates वर्कआउट ट्रेंडमध्ये आहे. करीना कपूर, जान्हवी कपूरसह अनेक बॉलिवूड अभिनेत्री वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी Pilates वर्कआउट करतात. ही कसरत ४५ मिनिटांची असते. या वर्कआउटमध्ये मांड्या आणि पायांसह कमरेच्या खालच्या भागांवर जास्त लक्ष दिले जाते. तुम्हीही या प्रकारचा व्यायाम करा आणि आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवा.

BetterHealth मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, Pilates ही कॅलिस्थेनिक्स व्यायामाने प्रेरित 500 व्यायामांची मालिका आहे. हे शरीरातील महत्त्वाच्या स्नायूंना संतुलित पद्धतीने वाढवण्यास मदत करते. याशिवाय, ते स्नायूंना अधिक लवचिक आणि मजबूत बनवते. दरम्यान, तुम्हाला कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या असल्यास, ते करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Pilates म्हणजे काय –

जोसेफ पिलेट्सने 1920 च्या दशकात अमेरिकेत याची सुरुवात केली. दुखापतीतून सावरण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी खेळाडू आणि नर्तक हा व्यायाम करतात. बातम्यांनुसार, हे अॅथलीट्सपासून सामान्य माणसांपर्यंत आणि अगदी गर्भवती महिलांनाही करता येते. अनेक ठिकाणी हा व्यायाम शिकवण्यासाठी वर्गही चालवले जातात. असे केल्याने घाम येत नाही. हा व्यायाम 5-10 मिनिटांच्या अंतराने करावा. तुम्ही हे दररोज सुमारे ४५ ते ९० मिनिटे करू शकता.

मानसिकदृष्ट्या सक्रिय करतो

असे केल्याने शारीरिक क्षमता वाढते आणि शरीरात लवचिकता येते. हा व्यायाम करून मानसिक बळही मिळू शकते. याशिवाय पिलेट्समुळे पोटाचे स्नायू आणि पाठीच्या खालच्या स्नायूंना बळकटी मिळते. सांधेदुखीतही आराम मिळतो. हा व्यायाम केल्याने तुमचा बॉडी शेप सुधारेल. हा व्यायाम शारीरिक जागरूकता आणि नियंत्रण वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. याशिवाय श्वास घेण्याची क्षमताही असे केल्याने वाढते. हा व्यायाम मस्कोस्केलेटल किंवा गाउट रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे. पाठीचा कणा मजबूत करण्यासोबतच, हा व्यायाम लोकांना मानसिकदृष्ट्या अधिक सक्रिय बनवतो. हा व्यायाम केल्याने तणावही कमी होतो, तसेच तुम्हाला अधिक रिलॅक्स वाटेल.

पिलेट्सचे प्रकार

पिलेट्सचे साधारणपणे दोन प्रकार असतात. प्रथम, सर्व व्यायाम चटईवर केले जातात. ते जमिनीवर करण्यामागचा उद्देश हा आहे की, ते स्नायूंना अधिक मजबूत आणि प्रतिरोधक बनवू शकतात जेणेकरून शरीराचा समतोल राखला जाईल. त्याच वेळी, दुस-या भागात डंबेलसारख्या उपकरणांचा वापर करून स्नायूंना बळकटी दिली जाते.

पिलेट्स वर्कआउटचे फायदे

हा व्यायाम केल्याने शरीराची स्थिती सुधारते. याशिवाय स्नायूही मजबूत होतात.

Pilates वर्कआउट करून वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी संतुलित आहार घ्या. यामुळे तुम्हाला लठ्ठपणापासून मुक्ती मिळते.

ही कसरत केल्याने मन आणि मेंदूमध्ये सुसंवाद निर्माण होतो. Pilates वर्कआउट केल्याने शरीराच्या सर्व समस्या दूर होतात. हा व्यायाम केल्याने शरीराचे सर्व अवयव मजबूत होतात.

स्नायूंच्या दुखापती कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर सिद्ध होते.

हे श्वसन रोग बरे करण्यास देखील सक्षम आहे. ही कसरत केल्याने तणावही दूर होतो.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं