AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरे कायऽऽ तणावामुळे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ वाढते… जास्त ताणतणाव असलेल्या लोकांमध्ये ‘रोगप्रतिकारक क्षमता’ मजबुत असल्याचे संशोधन

प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस' (पीएनएएस) च्या संशोधनात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात वाढत्या वयाच्या संबधातील आरेाग्याचे असंतुलन मांडण्यात आले आहे. ज्यात साथीच्या रेागासंबधी शरीरातील संभाव्य क्षमताशी निगडीत सशक्तीकरणासाठी शरीरातील काही ठरावीक पॉईंटस् चा शोध लागला आहे.

खरे कायऽऽ तणावामुळे ‘रोगप्रतिकारक शक्ती’ वाढते... जास्त ताणतणाव असलेल्या लोकांमध्ये ‘रोगप्रतिकारक क्षमता’ मजबुत असल्याचे संशोधन
हा ताण आरोग्याला ठेवी बराImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 14, 2022 | 8:37 PM
Share

जगात वृद्ध आणि प्रौढत्वाची लोकसंख्या वाढत आहे, वाढत्या वयात संबंधित आरोग्याचे चढउतार (Fluctuations in health) समजुन घेणे आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकारक प्रणालीतील वया संबंधीचे बदल हे, आरोग्याचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. असे, अमेरीकेतील वैद्यकीय तज्ज्ञ तथा प्रमुख अभ्यास लेखक एरिक क्लोपॅक, म्हणतात. त्यांच्या मते, वाढते वय आणि वृद्धत्वाशी निगडीत (Dealing with aging) रोगप्रतिकारक ‘शक्तीवर लिओनार्ड डेव्हिस स्कूल ऑफ जेरोन्टोलॉजी’ याच्या अभ्यासातून आरोग्याचा जटील गुंताही स्पष्ट झाला आहे. लोकांच्या वयानुसार, रोगप्रतिकारक प्रणाली नैसर्गिकरित्या खालवण्यास सुरवात होते, या स्थितीला इम्युनोसेन्सेस म्हणतात. वाढत्या वयाबरोबर, एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) कमकुवत होते आणि त्यात खूप जास्त जीर्ण झालेल्या पांढऱ्या रक्त पेशींचा समावेश होतो आणि नवीन आजारांशी देान हात करण्यासाठी खुप कमी प्रमाणात ताज्या आणि नव्या दमाच्या पांढऱया पेशींना सामना करावा लागतो.

काय आढळले संशोधनात

संशोधकांनी 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 5,744 प्रौढांचे संकलीत नमुन्यातील प्रतिसादांचे विश्लेषण केले. त्यांनी तणावपूर्ण जीवनातील घटना, दीर्घकालीन ताण, दररोजच्या सामाजिक तणावासह प्रतिसादकर्त्यांच्या अनुभवांचे मूल्यांकन संशोधनाअंती केले. सहभागीं प्रौढांच्या रक्त नमुन्यांचे संकलन करुन नंतर फ्लो सायटोमेट्रीद्वारे विश्लेषण केले गेले, एका प्रयोगशाळेतील तंत्र जे रक्त पेशींची गणना आणि वर्गीकरण करते. कारण रक्तकण लेसरच्या समोरील अरुंद प्रवाहात एक एक करून पास होतात. या तपासणीत अपेक्षेप्रमाणे, जास्त ताणतणाव असलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता मजबुत होती, ज्यामध्ये ताज्या रोगांशी लढणाऱ्यां पेशींची टक्केवारी अत्यल्प आढळून आली. आणि जीर्ण झालेल्या पांढऱ्या रक्त पेशींची टक्केवारी मात्र जास्त होती. शिक्षण, धूम्रपान, मद्यपानासह सहजीवनावर नियंत्रण ठेवल्यानंतर होणार्या नुकसानाच्या तुलनेत तणावपूर्ण जीवन जाणार्या वृद्धांच्या रक्तातील घटक पेशींचे सर्वात कमी नुकसान होत असल्याचे आढळून आले. त्यांच्या शरीरात जुन्या रक्तपेशी मजबुत होत्या आणि नव्या पेशींचा वापरही मर्यादीत आढळला.

टी-सेल्स

रोग प्रतिकारशक्तीचा एक महत्वाचा घटक थायमस नावाच्या ग्रंथीमध्ये परिपक्व होतात, जी हृदयाच्या अगदी समोर आणि वर बसते. जसजसे लोकांचे वय वाढत जाते तसतसे त्यांच्या थायमसमधील पेशी संकुचित होतात आणि त्यांच्या जागी फॅटी टिश्यू येतात, परिणामी रोगप्रतिकारक पेशींचे उत्पादन कमी होते. पुर्वीच्या संशोधनातून असे आढळून आले होते की, आहार-विहारातील बदल नित्कृष्टता व्यायामाचा अभाव, अधुनीक जिवनशैली या घटकांमुळे वृद्धत्वात वेगाने वाढ होते. कम वयात येणार वृद्धत्व टाळायचे असल्यास, सुयोग्य आहार, नियमीत व्यायाम आणि नियोजनबद्ध जिवनशैली अंगी कारण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.