सर्वांचा आवडता साबुदाणा! ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये
हा पदार्थ प्रत्येकासाठी फायदेशीर नसतो आणि जास्त खाल्ल्यास आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी साबुदाणा खाऊ नये.

मुंबई: साबुदाण्याची खिचडी, खीर, टिक्की आणि त्याचा पापड तुम्ही आपल्या घरात खाल्ले असतील, त्याची टेस्ट अनेक लोकांना आवडते. यामुळे शरीराला अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. मात्र हा पदार्थ प्रत्येकासाठी फायदेशीर नसतो आणि जास्त खाल्ल्यास आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी साबुदाणा खाऊ नये.
‘या’ आजारांमध्ये साबुदाणा खाऊ नका
मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांनीही साबुदाण्याचे सेवन करू नये कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा खाणे टाळावे, अन्यथा त्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात.
हृदयरोग
जर तुम्हाला हृदयविकार असेल तर साबुदाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कारण हा रक्तदाब सांभाळणे अवघड होईल. त्यात प्रथिने नसल्यामुळे आपण ते दररोज खाऊ शकत नाही.
लठ्ठ लोकं
जे लोक लठ्ठ आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करू इच्छित आहेत, त्यांनी साबुदाण्याचे सेवन थांबवावे कारण यामुळे कॅलरी आणि स्टार्च वाढते आणि चरबी आणि प्रथिने नसतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेटही भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)
