Health : उपाशी पोटी लिंबू पाणी पित असाल तर सावधान अन्यथा होईल आरोग्याचं भयंकर नुकसान!
लिंबू पाण्यामुळे तुमच्या शरीरातील काही भाग खराब होऊ शकतात. तर आता आपण लिंबू पाणी पिल्यामुळे काय नुकसान होते याबाबत जाणून घ्या.

मुंबई : बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पितात. त्यात ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या असते असे लोक आपलं वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पितात. तसेच लिंबू हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे सुद्धा लोक लिंबू पाणी मोठ्या प्रमाणात पिताना दिसतात. लिंबू हा आम्लयुक्त आहे तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ देखील आहे जे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते. पण हेच लिंबू पाणी तुम्ही जास्त प्रमाणात पिले तर ते तुमच्या शरीराला हानिकारक देखील ठरू शकते.
जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही समस्या असतील तर लिंबू पाणी पिणे टाळावे. कारण लिंबू पाणी तुमच्या शरीरास हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला किडनीशी संबंधित समस्या असताना तुम्ही लिंबू पाणी पिले तर उलट्या, मळमळ अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला किडनीशी संबंधित काही आजार असतील तर लिंबू पाणी पिणे टाळावं.
सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या पोटाचा पीएच अम्लीय झाला तर तुम्हाला ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. लिंबू हा आम्ल असल्यामुळे तुमच्या छातीत मळमळ किंवा जळजळ होऊ शकते तसेच उलटी देखील होऊ शकते. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्यामुळे तुमच्या पोटात देखील दुखू शकते. लिंबू पाणी हे तुमच्या आतड्यांचे अस्तर खराब करू शकते, ज्यामुळे अल्सरची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त लिंबू पाणी पिणे टाळावे.
लिंबू पाणी पिल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या हाडांवरती देखील होऊ शकतो. लिंबू पाणी पिल्यामुळे तुमची हाडे पोकळ होऊ शकतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते तसंच लिंबू हा आम्ल असतो त्यामुळे तुमच्या हाडांची झीज होऊ शकते. तसंच लिंबू पाणी पिल्यामुळे तुमच्या हांडामध्ये जमा झालेले कॅल्शियम झपाट्याने कमी होते त्यामुळे हाडे कमकुवत होतात, त्यामुळे लिंबू पाणी पिणे टाळावं.
