या लोकांसाठी अक्रोड खाण्याचे फायदेच फायदे ? डाएटमध्ये लगेच समावेश करा

अक्रोड सारखा सुकामेवा शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. आरोग्याच्या अनेक तक्रारी अक्रोडमुळे दूर होतात. आपण अनेक प्रकारे आपल्या आहारात याचा वापर करु शकतो.

या लोकांसाठी अक्रोड खाण्याचे फायदेच फायदे ? डाएटमध्ये लगेच समावेश करा
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 10:28 PM

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण अनेक पौष्टीक पदार्थांचा वापर करत असतो. ड्रायफ्रुट्सचा समावेश आहारात केला तर चांगले फायदे मिळतात. ड्राय फ्रुट्स तर पोषणासाठी सर्वात पौष्टीक असतात. काही ड्रायफ्रुटसचा आहारात समावेश केल्याने आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. अक्रोड हे त्यापैकी एक ड्रायफ्रुटस आहे. अक्रोडला आपल्या आरोग्यासाठी खूपच पोषक मानले जाते. रोज जर आपण अक्रोड खाल्ले तर शरीराला अनेक लाभ होतात. अक्रोडमध्ये फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि थियामिन सारखे पोषक तत्व असतात. जे शरीराच्या पोषणासाठी गरजेचे असतात.तर पाहूयात अक्रोड खाण्याची पद्धत आणि फायदे काय आहेत.

अक्रोड खाण्याची पद्धत काय ?

अक्रोड अनेक पद्धतीने खाऊ शकता. आपण थेट चावून खाऊ शकता किंवा पाण्यात भिजवन खाऊ शकता.अक्रोड सलाडमध्ये टाकूनही खाता येतो. नाश्त्यात ओट्समध्ये टाकूनही अक्रोड खाता येतो.

अक्रोड खाण्याचे फायदे काय ?

1. हृदय –

अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी एसिड असते. त्यामुळे ज्यांना हृदय रोगाचा त्रास असेल त्यांच्यासाठी अक्रोडचे सेवन फायदेशीर असते.

2. मेंदूचे आरोग्य –

अक्रोडचा आकार मेंदूच्या सारखाच असतो. मेंदूच्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. तुमची स्मृती चांगली होण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर होते. त्यामुळे वारंवार एखादी गोष्ट विसरण्याचा आजार दूर होतो.

3. लठ्ठपणा –

अक्रोडमध्ये हाय फायबर प्रोटीन असते. त्यामुळे आपले पोट बराच काळ भरलेले राहाते. त्यामुळे वारंवार जेवण्याची इच्छा कमी होते. त्यामुळे वजन आपोआप कमी होते.

4.डायबिटीज –

रोज जर आपण अक्रोड खाल्ला तर ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतो.

5. हाडे –

अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्स असतात. त्यामुळे आपली हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते.

6.त्वचा –

अक्रोडमध्ये असलेल्या फॅटी एसिडमुळे त्वचेला मॉश्चराईज होण्यासाठी मदत मिळते. तसेच केसांचे आरोग्यात देखील सुधारणा होते.

( सूचना – ही माहिती केवळ सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.