AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dengue Recovery Tips: डेंग्यू आजारातून लवकर बरं व्हायचं असेल तर खा ‘ही’ फळं

डेंग्यू झाल्यास रुग्णाला भरपूर आराम करण्यास सांगितले जाते. तसेच लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Dengue Recovery Tips: डेंग्यू आजारातून लवकर बरं व्हायचं असेल तर खा 'ही' फळं
| Updated on: Nov 23, 2022 | 5:18 PM
Share

नवी दिल्ली – सध्या डेंग्यूचा (Dengue)  आजार झपाट्याने पसरत असून त्याचे रुग्ण वाढत चालले आहेत. डेंग्यूचा ताप झपाट्याने पसरतो. असा ताप आल्यास रुग्णाला चांगली विश्रांती (care) घेण्यास सांगितले जाते. तसेच लवकर बरे वाटावे व डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी भरपूर द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशी अनेक सुपरफ्रुट्स (fruits) आहेत, जी खाल्याने रुग्णाला या आजाराशी लढण्याची ताकद मिळते, तसेच रिकव्हरीचा वेगही वाढतो.

1) किवी

डेंग्यू झालेला असताना किवी खाल्याने चांगला परिणाम होतो. यामध्ये असलेले कॉपर, हे निरोगी लाल रक्तपेशींच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देते आणि संसर्गापासून संरक्षण करते. किवी हे फळ पोटॅशिअम, व्हिटॅमिन -ई आणि व्हिटॅमिन -ए यांचा समृद्ध स्त्रोत आहे. जे शरीराचे इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते. किवीमध्ये व्हिटॅमिन-सी देखील असते, जे डेंग्यूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती देते.

2) डाळिंब

डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. ते निरोगी ब्लड प्लेटलेट्सची संख्या अथवा प्रमाण राखण्यास मदत करते, जे डेंग्यूतून बरे होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. डाळिंबाच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जाणवणारी थकवा आणि अशक्तपणाची समस्या डाळिंबाचे सेवन केल्याने दूर होते.

3) मालटा

डेंग्यूच्या रुग्णांसाठी लिंबूवर्गीय अथवा सिटरस फळे नेहमीच फायदेशीर मानली जातात. माल्टामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. डेंग्यूमध्ये अनेकदा रुग्णाच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यावेळी माल्टा उपयोगी ठरू शकते. माल्टा शरीराला हायड्रेटेड ठेवते, अशक्तपणाशी लढा देण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

4) पपई

पपई हे पाचक एंजाइम्स, पपेन आणि कायमोपैन यांचा एक चांगला स्रोत आहे. त्यामुळे पचनास मदत होते, जळजळ किंवा सूज रोखली जाते आणि पचनासंबंधी इतर समस्यांवर उपचार करण्यास मदत होते. डेंग्यूशी लढा द्यायचा असेल तर पपजईच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या पानांचा 30 मिली रस प्यायल्यास प्लेटलेटची संख्या वाढण्यास मदत होते.

5) नारळ पाणी

नारळाचे पाणी पिण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. त्यामध्ये असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक ताकद देतात. त्याची मिनरल्स आणि मीठ यामुळे शरीराचा डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो. डेंग्यूपासून लवकर बरे होण्यासाठी भरपूर प्रमाणात द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो, अशा वेळी नारळ पाण्याचे सेवन उपयुक्त ठरते.

6) ड्रॅगन फ्रूट

हे फळ अँटिऑक्सिडेंट्स, हाय फायबर आणि लोह, तसेच व्हिटॅमिन-सी यांचा समृद्ध स्त्रोत आहे. ड्रॅग फ्रूटच्या सेवनाने रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डेंग्यूच्या तापापासून त्यांचे संरक्षण होते. डेंग्यूच्या तापामुळे अनेकदा हाडांमध्ये तीव्र वेदना होतात, अशा वेळी ड्रॅगन फ्रूट हे हाडांची ताकद आणि हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते.

7) केळं

केळं हे एक असे फळ आहे जे पचण्यास अत्यंत सोपे आहे. डेंग्यूतून लवकर बरे होण्यासाठी रुग्णाला पचायला सोपे , पोषक तत्वं असलेले पदार्थ व संतुलित आहार सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी पोटॅशिअम, व्हिटॅमिन-बी-6 आणि व्हिटॅमिन-सी यांनी परिपूर्ण असलेले केळे खावे. ते आजाराशी लढण्यातही मदत करते.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.