मटर पनीर, आलू मटरवर मारताय ताव तर व्हा सावध, होऊ शकतात हे आजार

सिझनमधील भाजी आणि फळे खाणे खरेतर चांगले असते. परंतू हिरव्या वाटाण्याचा सिझन असल्याने तुम्ही जर आलू मटर, मटर पनीरवर आडवा हात मारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. हिरवे वाटाणे जादा खाणे आरोग्यासाठी नुकसान कारक आहे. का ते पाहा...

मटर पनीर, आलू मटरवर मारताय ताव तर व्हा सावध, होऊ शकतात हे आजार
green peasImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 2:34 PM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : हिवाळ्यातील भाज्यांमध्ये हिरवे वाटाणे किंवा मटार अनेकांना खायला खूप आवडत असतात. लोक आवडीने मटार खातात. आलू मटर, पनीर मटर अशा भाज्यांना मोठ्या चवीने खाल्ले जात असते. हिरव्या वाटाणे किंवा मटारमध्ये फायबर, प्रोटीन, एंटीऑक्साडेंट, विटामिन्स ए, ई, डी, सी, के, कोलीन, पँटोथॅनिक एसिड, रायबोफ्लेविन सारखे पोषक तत्वांचा समावेश असते. त्यामुळे हिरव्या वाटाण्याची भाजी चवीला चांगली लागते. परंतू कोणत्याही गोष्टीचे जादा सेवन आजाराला निमंत्रण असते. हिरव्या वाटाण्याची भाजी जादा खाल्ल्याने ॲसिडीटी, ब्लोटिंग, गॅस सारख्या समस्या होऊ शकतात. तर पाहूयात हिरवा वाटाणा जादा सेवनाचे काय दुष्पपरिणाम होऊ शकतात.

हिरव्या मटार जास्त खाल्ल्याने पोटदुखी आणि सूज येऊ शकते. यामुळे गॅसेसची समस्या वाढू शकते. मटारमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. मटार जास्त प्रमाणात सेवण केल्यास ते पचायला एकदम जड जाते. मटारमध्ये असलेले लेक्टीन पोटात जळजळ वाढवते. मटार जास्त खाल्ल्याने डायरिया देखील होऊ शकतो, हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढू शकते. मटार हा प्रथिनं आणि फायबरचा खूप चांगला स्रोत आहे, परंतु जास्त प्रमाणाच्या बाहेर मटार खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.

ॲसिडीटी –

हिरवी मटाराच्या जादा सेवनाने ॲसिडीटीचा त्रास होऊ शकतो. जास्त मटार खाल्ल्याने छातीत जळजळ आणि आंबट ढेकर सारखी समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

गॅस –

हिरव्या वाटाण्याने गॅसेसची समस्या निर्माण होऊ शकते. गॅस, अपचन अशा तक्रारी सुरु होऊ शकतात. हिरव्या मटारमध्ये असलेल्या प्रोटीनच्या अधिक प्रमाणामुळे जेवण पचनात अडचणी येऊ शकतात. ज्यामुळे गॅसचा त्रास होऊ शकतो.

लठ्ठपणा –

हिरव्या वाटाण्यातील प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट लठ्ठपणाला कारण ठरू शकतो. त्यामुळे अशात जर जास्त प्रमाणात हिरवे वाटाणे आहारात आले तर शरीरात लठ्ठपणा येऊ शकतो.

संधिवात –

हिरव्या वाटाण्यात असलेल्या प्रोटीन, अमिनो ॲसिड, फायबर आणि विटामिन्स डी हाडांसाठी फायदेमंद ठरु शकते. परंतू प्रमाणाच्या बाहेर याचं सेवन केल्याने संधिवाताची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे सांधे दु:खीचा त्रास होऊ शकतो.

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.