AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही स्प्लिट एंड्समुळे त्रस्त झालेले आहात? ‘हे’ हेअर ऑइल तुमची समस्या करेल दूर

तुम्ही जर स्प्लिट एन्ड्सच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या केसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. योग्य हेअर ऑइल निवडून आणि नियमित तेल लावल्याने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता. यामुळे तुमचे केस मजबूत तर होतीलच पण ते सुंदरही दिसतील.

तुम्ही स्प्लिट एंड्समुळे त्रस्त झालेले आहात? 'हे' हेअर ऑइल तुमची समस्या करेल दूर
| Edited By: | Updated on: Feb 17, 2025 | 3:38 PM
Share

केसांची काळजी घेताना आपण अनेकदा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कोरडेपणा, केस गळणे, निस्तेजपणा आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे स्प्लिट एंड्सची. दुतोंडी केसांमुळे केसांची वाढ थांबतेच पण केस कमकुवत आणि निर्जीव देखील होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येला कंटाळून वारंवार केस कापत राहतात. पण स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार केस कापणे योग्य नाही यासाठी योग्य पद्धतीने केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे. जर तुम्ही केसांची योग्य निगा राखली आणि काही खास हेअर ऑईलचा वापर केला तर स्प्लिट एंड्सची समस्या कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला काही हेअर ऑइलबद्दल सांगणार आहोत जे केसांना पोषण देतात, आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर करण्यास मदत करतात.

1. नारळाचे तेल

नारळाचे तेलामध्ये लॉरिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मुळापासून ते शेवटपर्यंत पोषण देतात. तसेच नारळाचे तेल तुमच्या स्कॅल्पला हायड्रेट करतात आणि केसांची आर्द्रता रोखून ठेवतात जेणेकरून स्प्लिट एंड्सची समस्या कमी होते. झोपण्यापूर्वी तुम्ही केसांना कोमट खोबरेल तेलाने मसाज करा आणि रात्रभर राहू द्या. आठवड्यातून 2-3 वेळा खोबरेल तेल लावल्याने केस मजबूत आणि निरोगी होतात.

2. बदाम तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे केसांची आतून दुरुस्ती करतात. स्प्लिट एंड्स कमी करण्यासोबतच ते केसांना चमकदार आणि मऊ बनवतात. आठवड्यातून दोनदा बदामाच्या तेलाने मसाज करा आणि 2 तासांनी सौम्य शाम्पूने धुवा.

3. कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईलमध्ये रिसिनोलिक ॲसिड असते, जे केस तुटण्यास प्रतिबंध करते आणि स्प्लिट एंड्स बरे करण्यास मदत करते. तसेच तुम्ही कॅस्टर ऑईल नियमित लावल्यास केसांची वाढ वाढवते आणि केस दाट बनवते.कॅस्टर ऑईल खूप घट्ट असते त्यामुळे ते नेहमी नारळाचे तेल किंवा बदामाच्या तेलात मिसळून वापरावे. आठवड्यातून एकदा हे तेल लावल्याने केस निरोगी आणि मजबूत होतील.

4. ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑइलमध्ये जीवनसत्त्वे ए आणि ई असतात, जे केसांची मुळे मजबूत करून कोरडेपणा कमी करतात. ऑलिव्ह ऑईल केसांना डीप कंडिशनिंग देते आणि स्प्लिट एंड्सची समस्या दूर करते. यासाठी तुम्ही जेव्हा केसांना शॅम्पू करणार तेव्हा 1 तास आधी ऑलिव्ह ऑइलने मसाज करा आणि नंतर सौम्य शाम्पूने धुवा.

5. आर्गन ऑईल

आर्गन ऑइलला “लिक्विड गोल्ड” म्हटले जाते कारण ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे फ्रिजीनेस नियंत्रित करते, केस मऊ करते आणि स्प्लिट एंड्स कमी करते. शॅम्पू लावल्यानंतर केसांच्या टोकांवर २-३ थेंब टाकून तसेच ठेवा. हे केसांना उष्णतेमुळे होणारे नुकसान आणि तुटण्यापासून वाचवते.

हेअर ऑइल कसे लावायचे?

केसांना हलक्या कोमट तेलाने मुळापासून टोकापर्यंत मसाज करा. केसांना रात्रभर तेल लावणे जास्त फायदेशीर आहे. घाईत असाल तर किमान २-३ तास ​​तेल केसांना लावून ठेवा. आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावा जेणेकरून केसांना पूर्ण पोषण मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.