Jamun Side effect : या लोकांनी चुकूनही खाऊ नका जांभूळ, आरोग्याला ठरु शकते हानिकारक

बरेच लोक गरजेपेक्षा जास्त जांभळाचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जांभूळ आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. (These people do not eat purple by mistake, it can be harmful to health)

Jamun Side effect : या लोकांनी चुकूनही खाऊ नका जांभूळ, आरोग्याला ठरु शकते हानिकारक
या लोकांनी चुकूनही खाऊ नका जांभूळ, आरोग्याला ठरु शकते हानिकारक

मुंबई : उन्हाळी हंगामात जांभूळ सहज उपलब्ध होते. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे बर्‍याच रोगांशी लढायला मदत करतात. जांभूळमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात मदत करते. या व्यतिरिक्त, जांभूळचा उपयोग अशक्तपणा दूर करण्यासाठी केला जातो. हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आयुर्वेदानुसार फक्त जांभूळच नाही तर त्याच्या बिया आणि पावडरही खूप फायदेशीर आहे. (These people do not eat purple by mistake, it can be harmful to health)

बरेच लोक गरजेपेक्षा जास्त जांभळाचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जांभूळ आयुर्वेदात औषध म्हणून वापरले जाते. परंतु आपल्याला माहिती आहे का? काही लोकांसाठी जांभूळ हानिकारक असतात. काही लोकांनी जांभळाचे सेवन करू नये.

रक्तातील साखर

जांभूळ उच्च रक्तदाब रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी जांभळाच्या बियांची पावडर किंवा जांभूळ खाण्याची शिफारस केली जाते. परंतु बर्‍याच वेळा उच्च ब्लड प्रेशरपासून मुक्त होण्यासाठी लोक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात याचे सेवन करण्यास सुरवात करतात. असे करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

बद्धकोष्ठता

जांभळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यात फायबरची मात्रा चांगली असते. परंतु त्यापेक्षा जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते, म्हणून ते मर्यादित प्रमाणातच हे खा.

चेहऱ्यावरील मुरुमे

जर आपली त्वचा तेलकट असेल आणि मुरुमाची समस्या होत असेल तर आपण जांभळाचे सेवन करणे टाळावे. जांभूळ खाल्ल्यामुळे मुरुमांची समस्या वाढते. म्हणून, त्याचे अधिक सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे.

उलट्यांची समस्या

जांभूळ खाल्ल्यानंतर बर्‍याच लोकांना उलट्यांचा त्रास होतो. म्हणून, सुरुवातीला 2 ते 3 जांभूळ खा. जर तुमची तब्येत चांगली असेल तरच त्याचे सेवन करा.

रक्त गोठणे

जर आपल्याला एथेरोस्क्लेरोसिस आणि रक्त गोठण्याची समस्या असेल तर जांभळाचे सेवन करणे टाळले पाहिजे. हे आपली समस्या वाढवण्यासाठी कार्य करते. म्हणूनच, हे फक्त आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या. (These people do not eat purple by mistake, it can be harmful to health)

इतर बातम्या

Modi cabinet expansion: मोदींचा टॉप फोर जैसे थे, शाहांकडे सहकार, राणेंकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, एका क्लिकवर वाचा संपूर्ण खातेवाटप

Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI