Video | पेटलेला गॅस सिलिंडर घेऊन नदीकडे धाव, आग विझविण्यासाठी दाखवलेली हिम्मत एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 07, 2021 | 11:35 PM

अग्निशमन दलातील जवानांची हिम्मत तसेच त्यांच्या धैर्याची प्रचिती करुण देणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम ठोकला आहे.

Video | पेटलेला गॅस सिलिंडर घेऊन नदीकडे धाव, आग विझविण्यासाठी दाखवलेली हिम्मत एकदा पाहाच
FIRE VIRAL VIDEO

मुंबई : या जगात काही कामे अशी आहेत जी करताना जिवाची बाजी लावावी लागते. अग्निशमन दलाकडून केले जाणारे आग विझविण्याचे काम हेसुद्धा यापैकीच एक आहे. मोठ्या इमारतींना तसेच कारखान्यांना लागलेल्या आगीला विझविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान मोठ्या हिमतीने असतात. (Firefighter pickup burning gas cylinder video went viral on social media)

हिम्मत आणि धैर्याची प्रचिती करुन देणारा व्हिडीओ

लागलेल्या आगीमुळे मोठी जीवितहानी होण्याचा धोका असतो. मात्र, तरीदेखील कशाचीही तमा न बाळगता हे जवान आपले काम करत असतात. अग्निशमन दलातील जवानांची हिम्मत तसेच त्यांच्या धैर्याची प्रचिती करुण देणारा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम ठोकला आहे.

आग लागलेले गॅस सिलिंडर उचलले

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका घराला आग लागल्याचे दिसत आहे. यावेळी या घरामधून एक अग्निशमन दलाचा जवान त्याच्या हातामध्ये एक गॅस सिलिंडर घेऊन येत असल्याचे आपल्याला दिसतेय. त्याने आणलेल्या सिलिंडरला चांगलीच आग लागली आहे. आणखी काही काळ तसेच सोडून दिले तर स्फोट होतो की काय अशी त्या गॅस सिलिंडरची स्थिती आहे. असे असतानादेखील व्हिडीओतील जवान गॅस सिलिंडर हातामध्ये घेऊन पळत सुटला आहे. त्याने हे सिलिंडर बाहेर आणले असून ते थेट समोरच्या नदीमध्ये फेकले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अग्निशमन दलाच्या जवानाचे हेच धाडस सर्वांना भावले आहे. सर्वांनी या जवानाचे तोडंभरून कौतूक केले आहे. त्याच्या हिमतीला दाद देत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे. दरम्यान हा व्डिडीओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहून नेटकरी अग्निशमन दलाच्या जवानाला सलाम ठोकत आहेत हे मात्र नक्की.

इतर बातम्या :

Video | ड्रायव्हिंग करत असताना पठ्ठ्याच्या फोनवर गप्पा, पुढे जे झाले ते एकदा पाहाच !

Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

(Firefighter pickup burning gas cylinder video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI