AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ड्रायव्हिंग करत असताना पठ्ठ्याच्या फोनवर गप्पा, पुढे जे झाले ते एकदा पाहाच !

सध्या अपघाताचा एक वेगळाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा अपघात पाहून हसावे की रडावे हेच मसजत नाही. ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन वापरल्यामुळे हा अपघात घडला आहे.

Video | ड्रायव्हिंग करत असताना पठ्ठ्याच्या फोनवर गप्पा, पुढे जे झाले ते एकदा पाहाच !
bike accident viral video
| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 9:19 PM
Share

मुंबई : छोट्या छोट्या चुकांमुळे अगदी भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आणि ऐकल्या असतील. या अपघातांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, सध्या अपघाताचा एक वेगळाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा अपघात पाहून हसावे की रडावे हेच मसजत नाही. ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन वापरल्यामुळे हा अपघात घडला आहे. (Man using Mobile Phone while driving got accident video went viral on social media)

ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर गप्पा

ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन वापरु नये असे आपण अनेकदा ऐकले आहे. मात्र, असे असूनही काही लोक सर्रासपणे मोबाईल वापरतात. सध्या व्हायरल होत असलेल्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर बोलत असल्याचे आपल्याला दिसतो आहे.

मोबाईलवर बोलताना रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न

व्हिडीओमधील व्यक्ती एक हाताने मोबाईल फोनवर बोलतोय तर दुसऱ्या हाताने तो दुचाकी चालवतो आहे. मोबाईलवर बोलत असताना तो रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हाच कारनामा त्याला महागात पडला आहे. मोबाईलवर बोलण्यामध्ये गुंग झाल्यामुळे आपण नेमके कोठे जात आहोत, याचे भानही त्याला राहिलेले नाही.

व्यक्तीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आहे.

परिणामी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा व्यक्ती वाहतुकीचे सर्व नियम मोडतो आहे. तसेच शेवटी दुचाकीवरील सर्व नियंत्रण सुटल्यामुळे व्हिडीओतील व्यक्ती मोबाईलसह दुचाकीला घेऊन कोसळला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला पाहून दुचाकीस्वारावर टीका केली आहे. तर काही लोकांना खळखळून हसू फुटले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला ‘jatt.life’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | आजीला इशारे करत आजोबा थिरकले, डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(Man using Mobile Phone while driving got accident video went viral on social media)

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?