Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ

या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एक विचित्र डान्स केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत.

Video | शराबी गाण्यावर तरुणाचा विचित्र डान्स, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर धुमाकूळ
dance viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपला थरकाप उडतो. मात्र, सध्या एक आगळावेगळा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एक विचित्र डान्स केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत. (man dancing like insane funny video went viral on social media)

सोशल मीडियावर एकापेक्षा एक डान्स करणारे डान्स दिवाने आपण पाहिले असतील. आपल्यातील डान्सची कलाकारी समाजमाध्यमांवर अपलोड करुन ते लाखो लोकांची शाब्बासकी मिळवतात. याच डान्सचे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काही लोक रातोरात स्टार झाल्याचेही आपण पाहिले आहे. सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओसुद्धा डान्सचाच आहे. मात्र, या व्हिडीओमधील डान्स पाहून आपल्याल आश्चर्य नव्हे तर हसू फुटेल. या व्हिडीओतील तरुणाने अतिशय मजेदार असा डान्स केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये ‘दो घुँट मुझे भी पिलादे शराबी’ हे हिंदी गाणे सुरु असल्याचे आपल्याला समजते आहे. या गाण्यावर काही लोक डान्स करत आहेत तर काही लोक हे सर्वांचा डान्स आवडीने पाहत आहेत. यामध्ये डान्स बघणाऱ्यांपैकीच एक तरुण अचानपणे थिरकताना आपल्याला दिसतो आहे. या तरुणाने आपल्या हाताची घडी घातली असून तशाच स्थितीत तो डोके डोलवत आहे. शेवटी तर डान्समध्ये त्याने स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले असून लोक त्याच्याकडेच पाहत आहेत. हद्द म्हणजे त्याला सावरण्यासाठी बाजूच्या एका व्यक्तीला त्याच्याकडे धाव घ्यावी लागली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY -mEmE pAgE- (@giedde)

दरम्यान, या मजेदार व्हिडीओला पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक हा व्हिडीओ मोठ्या गमतीने लाईक करत आहेत.

इतर बातम्या :

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | आजीला इशारे करत आजोबा थिरकले, डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | छोट्या मुलांनी गायलं 500 Miles चं बंगाली व्हर्जन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(man dancing like insane funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI