Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील अपघातसुद्धा अशाच प्रकारच्या चुकीमुळे झाला आहे. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच
scorpio accident

मुंबई : आपल्या देशात रोजच शेकडो अपघात होतात. या अपघाताचे व्हिडीओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा होतात. हे व्हिडीओ पाहून अगदी छोट्या चुकीमुळे लोकांनी आपला जीव धोक्यात घातल्याचे आपल्याला दिसते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील अपघातसुद्धा अशाच प्रकारच्या चुकीमुळे झाला असून अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Scorpio driver driving on wrong side met horrifying accident video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक स्कॉर्पिओ गाडी राँग साईडने जात असल्याचे आपल्याला दिसत आहे. राँग साईडने जात असल्यामुळे या कारचालकाच्या समोर अनेक वाहने येत आहेत. मात्र, असे असूनसुद्धा हा कारचालक पुढे-पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे.

अपघात टाळण्यासाठी स्कॉर्पिओ चालकाने स्टेअरिंग फिरवली

राँग साईडने वाहन चालवणे कधी-कधी जीवघेणे ठरू शकते. त्याचीच प्रचिती हा व्हिडीओ पाहून येत आहे. या रस्त्यावर भरधाव वेगाने अनेक कार धावत आहेत. अशा परिस्थितीत स्कॉर्पिओचालक चुकीच्या पद्धतीने गाडी चावलतो आहे. याच वेळी एक पांढऱ्या रंगाची कार अचानकपणे समोर आल्याचे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसते आहे. त्यानंतर अपघात टाळण्यासाठी स्कॉर्पिओचालकाने स्टेअरिंग फिरवली आहे. परिणामी भीषण अपघात घडला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा अपघात पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. रहदारीचे नियम न पाळल्यामुळे हा अपघात झाल्याचे अनेकजण म्हणत आहेत. तर काही नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | आजीला इशारे करत आजोबा थिरकले, डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | छोट्या मुलांनी गायलं 500 Miles चं बंगाली व्हर्जन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | रशियन तरुण-तरुणींचा जबरदस्त भांगडा, धमाकेदार डान्स एकदा पाहाच !

(Scorpio driver driving on wrong side met horrifying accident video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI