Video | आजीला इशारे करत आजोबा थिरकले, डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. त्यांच्या याच डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय़ ठऱला आहे.

Video | आजीला इशारे करत आजोबा थिरकले, डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
old-man-dance


मुंबई : असं म्हणतात की माणसाच्या जगण्याला कोणत्याही मर्यादा नसाव्यात. मिळालेलं जीवन आपण दिलखुलासपणे जगलं पाहिजे. पण प्रत्यक्षात मात्र कित्येकांना अशा प्रकारे जगणे जमत नाही. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन आजी-आजोबा आपल्याला बिनधास्तपणे जगताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आजी-आजोबांनी जोरदार डान्स केला आहे. त्यांच्या याच डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय़ ठऱला आहे. (old man and woman dancing on Dilbar Dilbar song video went viral on social media)

गाण्याचा आवाज येताच आजोबांनी ठेका धरला

या व्हिडीओमध्ये आजी-आजोबा बिनधास्तपणे डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये ‘दिलबर दिलबर’ हे गाणे सुरु झाले आहे. गाणे सुरु होताच बाहेर उभे असलेल्या आजोबांना स्फुरण चढलं आहे. गाण्याचा आवाज येताच बाहेर अभे असलेल्या आजोबांनी उडी घेत गाण्यावर ठेका धरला आहे. ते समोर उभ्या असेलेल्या आजीला इशारे करत-करत डान्स करत आहेत.

आजीनेही डान्स करायला केली सुरुवात

आजोबांना पाहताच व्हिडीओतील आजीबाईंनाही डान्सचा मूड झाला आहे. त्यानंतर आजीनेही आजोबांसोबत ठुमके घ्यायला सुरुवात केली आहे. आजीने डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या दोघांनाही जोरदार दाद दिली आहे. आजी-आजोबा अगदीच मजेदार डान्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, हा व्हिडीओ Nitesh Mishra यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण 17 लाख नेटकऱ्यांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

Video | छोट्या मुलांनी गायलं 500 Miles चं बंगाली व्हर्जन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | रशियन तरुण-तरुणींचा जबरदस्त भांगडा, धमाकेदार डान्स एकदा पाहाच !

Video | भर मंडपात एकमेकांना इशारे, नवरदेव-महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(old man and woman dancing on Dilbar Dilbar song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI