Video | छोट्या मुलांनी गायलं 500 Miles चं बंगाली व्हर्जन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये दोन लहान मुले Bobby Bare चे लोकप्रिय असे “500 Miles” हे गीत गाताना दिसत आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे.

Video | छोट्या मुलांनी गायलं 500 Miles चं बंगाली व्हर्जन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
500-miles


मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. गीत तसेच संगिताचे तर अनेक व्हिडीओ मोठ्या संख्येने अपलोड केले जातात. सध्या असाच एक बंगाली भाषेतील गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुले Bobby Bare चे लोकप्रिय असे “500 Miles” हे गीत गाताना दिसत आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे. (Bangla version of Five Hundred Miles by bobby bare went viral on social media)

500 Miles गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन

एखादे गाणे लोकप्रिय झाले की चाहते त्याला अक्षरश: डोक्यावर घेतात. नंतर प्रेमापोटी लोक या गाण्याचे विविध भाषेत रिमेकसुद्धा करतात. Bobby Bare च्या “500 Miles” या गाण्याची गोष्टही अगदी अशीच आहे. या गाण्याला जगभरातून पसंदी मिळत असून लोकांनी या गाण्याचे वेगवेगळ्या भाषेत व्हर्जन तयार केले आहेत. याच गाण्याचे बंगाली भाषेतील व्हर्जनही तयार करण्यात आले असून तेसुद्धा चांगलेच लोकप्रिय होत आहे.

500 Miles बंगाली व्हर्जन मुलांनी गायलं

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये “500 Miles” गाण्याचे बंगाली व्हर्जन दोन छोट्या मुलांनी गायले आहे. अन्वय चक्रवर्ती आणि अन्वेश कांजीलाल अशी या मुलांची नावे आहेत. त्यांनी सादर केलेल्या या गाण्याचा व्हिडीओ अन्वयचे वडील अरिंदोम यांनी सोशल मीडियावर अपलोड केला असून त्याला नेटकऱ्यांनी चांगलाची दाद दिली आहे.

1.55 मिनिटांचा व्हिडीओ अचानकपणे व्हायरल

या गाण्याविषयी अरिंदम यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील अन्वय हा त्यांचा मुलगा असून अन्वेश हा भाचा आहे. या छोट्या मुलांचा एक ‘उडला गा’ नावाचा बँड आहे. याच बँड अंतर्गत या मुलांनी हे बंगाली गाणे गाण्याचा प्रयत्न केला. या 1.55 मिनिटाच्या रिमेक व्हर्जनमध्ये त्यांचा मुलगा अन्वय हा गिटार वाजवत गाणे म्हणतो आहे. तर दुसरा मुलगा नंतर गाणे गात आहे. हा व्हिडीओ अचानकपणे रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यानंतर 500 Miles या गाण्याच्या बंगाली व्हर्जनला नेटकऱ्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच या व्हिडीओला नेटकरी शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | रशियन तरुण-तरुणींचा जबरदस्त भांगडा, धमाकेदार डान्स एकदा पाहाच !

Video | भर मंडपात एकमेकांना इशारे, नवरदेव-महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | ओव्हरलोडेड ट्रकचा भीषण अपघात, धड झाले वेगळे, चाक लागले रस्त्यावर पळायला, व्हिडीओ व्हायरल

(Bangla version of Five Hundred Miles by bobby bare went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI