AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे या लोकांना पडू शकते भारी

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून ते पितात. या पेयामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. पण रिकाम्या पोटी हे पाणी पिणे अनेक लोकांसाठी धोकादायकही ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिणे या लोकांना पडू शकते भारी
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 07, 2023 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली – वजन कमी (weight loss) करण्यासाठी लोक हजारो मार्ग अथवा टिप्सचा अवलंब करतात. पण रिकाम्या पोटी पाण्यात मध आणि लिंबू मिसळून पिणे (lemon honey water) हे वजन कमी करण्याच्या टिप्सच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. असे बरेच लोक आहेत जे दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मध मिसळून कोमट पाणी पितात. बरेच लोक याला सकाळची चांगली सवयही (morning routine) समजतात, विशेषतः हिवाळ्यात. वजन कमी करण्यासाठी आणि हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी हे बऱ्याच लोकांचे आवडते पेय ठरू शकते.

पण तुम्हाला माहित आहे का की, लिंबू -मध-पाणी पिण्याचे काही तोटे देखील असू शकतात. खरं तर, काही लोकांना याचा फायदा होण्याऐवजी, त्याचे खूप नुकसान होऊ शकते. हे अनेक समस्यांना निमंत्रण देते आणि कधीकधी पोटात जळजळ किंवा वेदना होऊ शकते. रिकाम्या पोटी मध- लिंबू- पाणी पिणे हे वजन कमी करण्यासाठी कितपत योग्य आहे किंवा नाही, ते जाणून घेऊया.

सकाळी मध खाण्याचे फायदे

डॉक्टर बऱ्याच वेळेस सकाळी रिकाम्या पोटी मध खाण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते जी तुमच्या शरीरात दिवसभर राहते. याशिवाय झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाल्यामुळे शांत झोप तर लागतेच त्याशिवाय पचनक्रियाही सुधारते, तसेच शरीर आणि मनाला आराम मिळतो. मध एक उत्कृष्ट नैसर्गिक औषध आहे. दररोज सकाळी एक चमचा मध खाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासही मदत होते.

मध-लिंबू पाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो ?

मध आणि लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीराला फ्री-रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. फ्री रॅडिकल्स हे अन्न पचनाच्या वेळी आपल्या शरीरात तयार होतात आणि ते शरीरासाठी हानिकारक असतात. म्हणूनच तज्ञ दररोज एक ग्लास पाण्यात मध व थोडासा लिंबाचा रस मिसळून पिण्याची शिफारस करतात. हे एक उत्तम पेय असून त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि शरीरातील चरबी वितळते.

कोमट पाण्यात मध व लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने एक डिटॉक्स ड्रिंक तयार होते, जे वजन कमी करणे, बद्धकोष्ठता आणि जळजळ यापासून आराम देते तसेच यकृत साफ करण्यासही मदत करते. या पेयाच्या सेवनाने शरीराल एक किंवा दोन नव्हे तर अगणित फायदे मिळतात. रिकाम्या पोटी कोमट पाण्याचा शरीरावर चमत्कारिक प्रभाव पडतो. याशिवाय लिंबू आणि मध या दोन्हींचे स्वतःचे फायदे आहेत. अशा वेळी या तिन्हींचे मिश्रण करून बनवलेले हे पेय शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.

मध व लिंबू घातलेले हे पेय कसे बनवावे ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हे पेय बनवताना पाणी जास्त गरम नसावे, तर केवळ कोमट असावे. या पाण्यात जास्तीत जास्त 200 ते 250 मिली मध आणि थोडा लिंबाचा रस घालावा. हे नीट मिक्स करून हळूहळू पीत त्याचा आनंद घ्या. साधारण दोन महिन्यात तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी झाल्याचे दिसेल.

मध-लिंबू-पाणी कोणी पिऊ नये ?

पोटात अल्सर आणि ॲसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी हे पेय पिऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. रिकाम्या पोटी मध आणि लिंबू पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला पोटात जळजळ होत असेल तर तुम्हाला ॲसिडिटी किंवा पोटात अल्सरची समस्या असू शकते. यामुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते आणि नंतर तुम्हाला वेदना देखील होऊ शकतात. त्यामुळे अशा वेी मध-लिंबू-पाणी पिणे टाळावे. याशिवाय जर एखाद्याला टॉन्सिल्सची समस्या असेल तर त्यांनीही हे पेय जास्त पिऊ नये.

मधुमेहाच्या रुग्णांनी लांब रहावे

मधुमेहग्रस्तांसाठी मध-लिंबू-पाण्याचे सेवन योग्य नाही कारण मध हा गोड असतो. त्यामुळे मधुमेहींनी मध व साखरेपासून लांब रहावे.

बॅरिॲट्रिक सर्जरी झालेल्या लोकांनी चुकूनही हे पेय पिऊ नये

जर तुमची नुकतीच वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच बॅरिॲट्रिक सर्जरी झाली असेल, तर तुम्ही हे पेय पिऊ नका. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अशा लोकांनी ऑपरेशननंतर मध किंवा साखरचे सेवन केल्यास डंपिंग सिंड्रोम होऊ शकतो, जी अत्यंत धोकादायक स्थिती असू शकते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.