Home Remedies : ताप आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

बऱ्याच वेळा आपल्या सर्दी आणि ताप वारंवार येते. सर्दी आणि ताप येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, बदलते हवामान, खराब जीवनशैली आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयी यामुळे देखील सर्दी आणि ताप येण्याची शक्यता असते.

Home Remedies : ताप आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा!
सर्दी आणि ताप

मुंबई : बऱ्याच वेळा आपल्या सर्दी आणि ताप वारंवार येते. सर्दी आणि ताप येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, बदलते हवामान, खराब जीवनशैली आणि बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याच्या सवयी यामुळे देखील सर्दी आणि ताप येण्याची शक्यता असते. पावसाळ्यामध्ये तर सर्दी आणि ताप येण्याची समस्या सामान्यच होते. कारण वातावरण थंड असते. (This home remedy is beneficial for getting relief from fever and cold)

सर्दी आणि ताप दूर करण्यासाठी घरगुती उपाय

-कोमट पाण्याने गुळण्या करा
कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून दिवसातून दोनदा गोळण्या करा. यामुळे सर्दीपासून आराम मिळेल.

-कोमट पाणी प्या
ताप आल्यावर थंड पाणी पिणे टाळा. दिवसभर कोमट पाणी प्या.

फळे आणि भाज्या खा

जेव्हा आपल्याला सर्दी होते. तेव्हा व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्या अधिक खा. सर्दीपासून मुक्त होण्यासाठी व्हिटॅमिन सी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. व्हिटॅमिन सी समृध्द असलेली काही फळे आणि भाज्या जसे टोमॅटो, पालक, आवळा, लिंबूवर्गीय फळे आणि ब्रोकोली यांचा आहारात समावेश करा.

वाफ घ्या

सर्दी आणि ताप दूर करण्यासाठी वाफ घेणे फायदेशीर आहे. दिवसातून दोनदा वाफ घ्या, यामुळे तुम्हाला आराम मिळेल. वाफेच्या पाण्यात अजवाईन टाकून वाफ घ्या. हे सायनस लवकर उघडण्यास मदत करते. वाफेच्या पाण्यामध्ये निलगिरी तेलाचे काही थेंब तुम्ही घालू शकता.

हर्बल टी

दिवसातून दोनदा हर्बल टी प्या. तुम्ही ते आले, काळी मिरी, तुळशीची पाने आणि हळद वापरून बनवू शकता. थोड्या पाण्यात, सर्व साहित्य-किसलेले आले, 2-3 काळी मिरी, काही तुळशीची पाने आणि किसलेली हळद घाला. ते काही मिनिटे उकळवा आणि फिल्टर करा आणि प्या.

काढा

आपण घरगुती काढा देखील घेऊ शकता. यासाठी तुम्ही 1 टिस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून आल्याचा रस आणि एक चिमूटभर हळद यांचे मिश्रण तयार करू शकता. दिवसातून 3-4 वेळा काढा प्या.

प्राणायाम करा

प्राणायाम हा श्वसनावर लक्ष केंद्रित करण्याचा एक सामान्य योग आहे. हे सर्दीपासून मुक्त होण्यास मदत करू शकते.

निरोगी अन्न खा

तुम्ही तुमच्या आहारात फळांचे रस, नारळाचे पाणी, रसाळ फळे आणि उकडलेल्या भाज्यांचा समावेश करू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This home remedy is beneficial for getting relief from fever and cold)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI