AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात चहासोबत ‘या’ 5 पदार्थांचे सेवन शरीरात करतात विषासारखा परिणाम

पावसाळ्यात चहा आणि पकोडे खाणे अनेकांना आवडते, पण हे आवडणारे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फक्त पकोडेच नाही तर चहासोबत इतर अनेक पदार्थ शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. तर चहा सोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे ते जाणून घेऊयात...

पावसाळ्यात चहासोबत 'या' 5 पदार्थांचे सेवन शरीरात करतात विषासारखा परिणाम
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 11, 2025 | 2:01 PM
Share

पावसाळा हा ऋतू पाऊस, एक कप चहा आणि पकोडे हे समीकरण परिपूर्ण मानले जातात. पावसाळ्यात अनेकदा काहीतरी खावेसे वाटते. विशेषतः चहासोबत अनेकदा काही लोकं काही पदार्थ खात असतात, जे मनाला शांती देते आणि उत्तम चव मिळते. परंतु असे काही पदार्थ आहेत जे चहासोबत खाल्ल्यास तुमच्या शरीराला आतून नुकसान करते.

हो, फक्त पकोडेच नाही तर चहासोबत इतर अनेक पदार्थ खाणे देखील हानिकारक असू शकते. मात्र याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तर यासाठी आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे चहासोबत खाल्ल्यास शरीरात विषासारखे परिणाम करतात आणि ते तुमच्या आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकतात. चला जाणून घेऊया हे 5 पदार्थ कोणते आहेत…

चहा आणि पकोडे

चहा आणि पकोडे हे चहासोबत खाण्यासाठी आवडते कॉम्बिनेशन आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात लोकं सहसा चहा आणि पकोडे एकत्र खाण्यासाठी बाहेर जातात. तर काहीजण घरीच याचा आस्वाद घेतात.मात्र हे मिश्रण तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. चहासोबत पकोडे किंवा इतर तळलेले पदार्थ खाल्ल्याने यकृताचे गंभीर नुकसान होते. तसेच यामुळे त्वचा देखील निस्तेज दिसते.

चहा आणि बिस्किटे

चहा आणि बिस्किटे एकत्र खाल्लेले नसतील असा क्वचितच कोणी असेल. साधारणपणे नाश्त्यासाठी हा एक परिपूर्ण आणि सोपा पर्याय मानला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की हे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते? खरं तर, त्यात लपलेले रिफाइंड साखर आणि ट्रान्स फॅट तुम्हाला हळूहळू लठ्ठपणा आणि मधुमेहाकडे ढकलतात.

चहा आणि टोस्ट

फक्त बिस्किटेच नाही तर अनेकांना चहासोबत टोस्ट खायला आवडते. तथापि हे दोन्ही एकत्र खाणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. खरं तर, चहा आणि प्रक्रिया केलेले टोस्ट बीपीशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. गरम चहा आणि टोस्ट एकत्र सेवन केल्याने नसांवर अतिरिक्त दबाव येतो.

चहा आणि ब्रेड

चहा-ब्रेड हे एक सामान्य कॉम्बिनेशन आहे आणि आपल्यापैकी बरेच लोकं बऱ्याच काळापासून नाश्त्यात खातात. मात्र या दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. चहा आणि ब्रेड एकत्र खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ होते .

चहा आणि नमकीन पदार्थ

बऱ्याचदा बरेच लोक संध्याकाळच्या चहासोबत नमकीन पदार्थ मोठ्या आवडीने खातात, पण तुम्हाला माहिती आहे हे कॉम्बिनेशन तुम्हाला अनेक प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. यामुळे पोटफुगी आणि पाण्याची कमतरता होऊ शकते. खरं तर, नमकीनमध्ये असलेले मीठ चहामध्ये मिसळल्यास तुम्हाला डिहायड्रेट करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा