AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्किन्सनचा आजार ओळखण्यासाठी नवे उपकरण, वेळीच समजतील लक्षणे

हे नवे डिव्हाइस रुग्णाच्या चालीवर लक्ष ठेवू शकते, ज्याचा उपयोग पार्किन्सनची लक्षणे आणि औषधांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो.

पार्किन्सनचा आजार ओळखण्यासाठी नवे उपकरण, वेळीच समजतील लक्षणे
न्यूरॉलॉजिकल आजार Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 28, 2022 | 2:01 PM
Share

मुंबई,  जगभरात अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरॉलॉजिकल आजार (neurological disorders) असतात. त्यामध्ये जागतिक स्तरावर पार्किन्सनचा (Parkinsons) आजार अतिशय वेगाने वाढत चालला आहे. मात्र त्याचा मागोवा घेणे हे कठीण आव्हान आहे. कारण पार्किन्सनची लक्षणे रुग्णांमध्ये खूप उशिरा आढळून येतात. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (MIT) इंजिनिअर्सनी हा आजार ट्रॅक करण्याचा एक मार्ग शोधून काढला आहे. या इंजिनिअर्सनी एक इन-होम डिव्हाइस डिझाइन केले असून या डिव्हाईसचे संशोधन सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहे. या डिव्हाईसच्या मदतीने घरातील व्यक्तीमध्ये पार्किन्सन या आजाराची लक्षणं ओळखता येतात. विशेषत: जे लोक शहर आणि रुग्णालयांपासून दूर राहतात त्यांच्यासाठी हे डिव्हाईस फायदेशीर ठरेल. याच्या क्लिनिक ट्रायल दरम्यान, इंजिनअर्सनी असा दावा केला आहे की हे डिव्हाइस पार्किन्सनच्या रुग्णाला ओळखू शकते. या डिव्हाइसच्या मदतीने घरच्या घरी पार्किन्सन आजाराचा शोध घेता येईल.

हे डिव्हाईस कसे कार्य करते?

हे नवे डिव्हाईस रुग्णाचा वेग आणि चालणे यावर लक्ष ठेवू शकते,ज्याचा उपयोग पार्किन्सनची लक्षणे आणि औषधांचे मूल्यांकन करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस एखाद्या वाय-फाय राऊटरसारखे आहे जे रेडिओ सिग्नलचा वापर करून डेटा गोळा करते. ते घरात कुठेही बसवता येऊ शकते. हे डिव्हाईस व्यक्तीच्या हालचालीच्या वेगाचा मागोवा घेते. ज्यामुळे रुग्णामध्ये हा आजार असल्यास ते आढळून येते. या उपकरणामुळे सर्व रुग्णांचे अधिक चांगले मॉनिटरिंग झाले आहे, असे या अभ्यासात सहभागी असलेल्या दीना कटाबी यांनी सांगितले.

या संशोधनात, 50 सहभागीं लोकांसह त्यांच्या घरी एक वर्षासाठी अभ्यास केला. आणि मिळालेल्या डेटाच्या ट्रॉव्हचे विश्लेषण करण्यासाठी मशीन-लर्निंग अल्गोरिदमचा वापर करण्यात आला. संशोधनादरम्यान, 34 लोकांमध्ये पार्किन्सनची लक्षणे दिसून आली.

पार्किन्सन म्हणजे काय?

पार्किन्सन हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून त्यामध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टमवर प्रभाव पडतो. हा आजार सामान्यत: वृद्धांना अधिक होतो. यामध्ये रुग्णाच्या शरीराचा तोल जाऊन त्याला चालण्यास त्रास होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याची सुरुवात हळूहळू होते, म्हणजेच त्याची लक्षणे कधी दिसू लागली हे कळत नाही. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर, लक्षणांची तीव्रता वाढते.

या आजारावर सध्या कोणताही नेमका इलाज उपलब्ध नाही. फक्त त्याची लक्षणे कमी केली जाऊ शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या मते, पार्किन्सन रोग हा मेंदूचा विकार आहे. यामध्ये रुग्णाची मानसिक स्थिती बिघडू शकते. या रोगाच्या लक्षणांमध्ये मानसिक आणि वर्तणूकीत बदल होणे, झोपेची समस्या, नैराश्य, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यास त्रास होणे आणि थकवा येणे अशा लक्षणांचा समावेश आहे.

या कारणामुळे होतो पार्किन्सन

हा आजार तेव्हा होतो, जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागातील चेतापेशी किंवा न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात. सामान्यतः हे न्यूरॉन्स डोपामाइन नावाचे एक महत्त्वाचे मेंदूचे रसायन तयार करतात. जेव्हा हे न्यूरॉन्स मरतात किंवा कमजोर होतात. तेव्हा ते कमी डोपामाइन तयार करतात. त्यामुळे पार्किन्सन रोग होतो.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार