AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा करतायेत सामना…, ज्यावर औषधांशिवाय नियंत्रण मिळवणं कठीण

आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतच नाही, अशात अनेक समस्यांचा त्यांना समना करावा लागतो. पण अशी एक समस्या आहे, जिचा सामना 100 पैकी 95 महिला करतात... पण त्यावर औषधांशिवाय नियंत्रण मिळवणं देखील कठीण आहे.

100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा करतायेत सामना..., ज्यावर औषधांशिवाय नियंत्रण मिळवणं कठीण
| Updated on: Jun 29, 2026 | 2:44 PM
Share

आजच्या धावपळीचा परिणान महिलांच्या जीवनावर होत आहे. ऑफिस, घर, जबाबदाऱ्या, तणाव… यासारख्या गोष्टींचा महिला रोज सामना करत असतात. अशात महिलांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागतात. आज पाहायला गेलं तर, 100 पैकी 95 महिला एकाच समस्येचा समना करत आहेत आणि ती समस्या आहे थायरॉईड…. थायरॉईडची समस्या आता प्रत्येक घरात निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण मुली आणि महिलांना याचा त्रास होत आहे. मात्र, ही समस्या जितक्या वेगाने वाढत आहे, तितक्याच वेगाने सोशल मीडियावर पसरणारा खोटा प्रचार आणि घरगुती उपायही व्हायरल होत आहेत. “हा रस प्या आणि तुमचा थायरॉईड बरा होईल, आणि या योगासनामुळे गोळ्या घेण्याची गरज नाही” असे सांगणाऱ्या नेटकऱ्यांच्या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे? वैद्यकीय शास्त्र नेमके काय सांगतं? ते मुंबईतील नामांकित डॉक्टरांकडून जाणून घेऊ.

जेव्हा शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनचे संतुलन बिघडते, तेव्हा थायरॉईडची समस्या उद्भवते. यामुळे तीव्र थकवा, वजनात अचानक वाढ किंवा घट, मानसिक ताण आणि महिलांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता यांसारख्या हजारो समस्या निर्माण होऊ शकतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली डिटॉक्स ड्रिंक्स किंवा हर्बल सप्लिमेंट्स थायरॉईड पूर्णपणे बरा करू शकतात, हा दावा डॉक्टरांनी फेटाळून लावला आहे. “थायरॉईडच्या समस्या सहसा आपोआप बऱ्या होत नाहीत. शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी डॉक्टरांच्या देखरेखीखालीच औषधे घेतली पाहिजेत. जर तुम्ही उपचारांकडे दुर्लक्ष करून स्वतःच औषधोपचार केले, तर भविष्यात तुम्हाला अधिक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

मधुमेह आणि हार्मोनल तज्ञ डॉ. आरती उल्लाल सांगतात, केवळ जीवनशैलीतील बदल किंवा आहार नियंत्रणाने थायरॉईड पूर्णपणे बरा करणं शक्य नाही. चांगला आहार आणि नियमित व्यायाम थायरॉईड ग्रंथीच्या कार्यासाठी निश्चितपणे मदत करू शकतात. पण ते औषधांना दुसरा पर्याय ठरू शकत नाहीत. दीर्घकाळ व्यायाम किंवा आहाराच्या नियमांमुळे कधीकधी हार्मोनची पातळी तात्पुरती नियंत्रणात येऊ शकते. पण तो आराम फार काळ टिकत नाही. शिवाय, इंटरनेटवरून अज्ञात हर्बल पेये प्यायल्याने हार्मोनल चढउतार वाढू शकतात आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

थायरॉईडच्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. इंटरनेटवरील ट्रेंड्सचे आंधळेपणाने अनुसरण करण्यापूर्वी किंवा स्वतःच्या लॅब रिपोर्ट्सच्या आधारे निर्णय घेण्यापूर्वी, पात्र एंडोक्राइनोलॉजिस्ट किंवा सामान्य डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे. योग्य वैद्यकीय उपचार, निरोगी जीवनशैलीसह, तुमचा थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा