AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किचनमधील असा एक मसाला, केसांच्या समस्या चुटकीत संपतील, महागडे प्रोडक्टही फिके

hair care home remedies: केसांचे आरोग्य सुधारण्याचे रहस्य तुमच्या स्वयंपाकघरात लपलेले आहे. आपण मेथीच्या दाण्यांबद्दल बोलत आहोत. मेथी भिजवा, त्याची पेस्ट बनवा आणि केसांना लावा. काही दिवसातच केस गळणे थांबेल आणि केस चमकू लागतील. चला जाणून घेऊया काय आहेत मेथीचे फायदे.

किचनमधील असा एक मसाला, केसांच्या समस्या चुटकीत संपतील, महागडे प्रोडक्टही फिके
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 2:09 PM
Share

आपण आपल्या केसांची निगा राखण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रयोग करून बघतो. अनेकदा हजारो रूपये खर्च करतो परंतु वातावरणातील बदलामुळे आणि बदलत्या ऋतूमुळे केसांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न अनेकवेळा आपल्या मनामध्ये येतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये एक अशी जागा आहे जिथे केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी घरच्या घरी अनेक आयुर्वेदिक उपाय केले जातात. उत्तराखंडमध्ये बागेश्वर नावाची जागा आहे जिथे लोकं त्यांच्या उपचारांसाठी घरगुती उपाय करतात. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करतात. मेथीदाणे तुमच्या आरोग्यासह केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

तुम्हाला जर केसगळती किंवा केसामध्ये कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही मेथीच्या दाण्यांचा वापर करू शकता. मेथीच्या दाण्यांचा वापर केस चमकदार आणि अधिक मऊ करण्यासाठी केला जातो. केसांवर मेथीचा वापर केल्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. बागेश्वरच्या स्थानिक तज्ञं भावना रावत यांनी दिलेल्या एका मुलाखाती दरम्याण मेथीचे अनेक फायदे सांगितले आहेत. चला जाणून घेऊया केसांची घरगुती उपाय वापरूण काळजी कशी घ्यावी?

केसांना निरोगी आणि जाड ठेवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम मेथीचे दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवा. त्यानंतर सकाळी मेथी मिक्सरच्या वापराने बारिक करूण घ्या. मेथीची बारिक पेस्ट बनवल्यानंतर तयार पेस्ट केसांच्या मुलांपासून टोकांपर्यंत संपूर्ण केसांना लावा. मेथीची पेस्ट तुमच्या केसांवर किमान 30 ते 40 मिनिटे राहू द्या. त्यानंतर तुमच्या केसांना मस्त या पेस्टनी मसाज करा आणि कोमट पाण्यानी स्वच्छ धुवा. केसांवर मेथीची पेस्ट नियमित पणे 2 वेळा लावा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळते आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. मेथीची पेस्ट केवळ तुमच्या केसांना मजबूत करत नाही तर केसांना नैसर्गिकरित्या चमकदार आणि मऊ करते. तुम्हाला जर केसांमध्ये कोंड्याच्या समस्या असतीस तर तुम्ही देखील मेथीच्या पेस्टचा वापर करू शकता. तुम्हाला पांढऱ्या केसांची समस्या असतील तर तुम्ही केसांवर मेथीच्या पेस्टचा वापर करू शकता. अनेकांना आजकाल शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे पांढऱ्या केसांची समस्या उद्भवते अशा लोकांनी त्यांच्या केसांवर या मेथीच्या पेस्टचा वापर करावा.

दुसरी पद्धत म्हणजे मेथी आणि दही मिसळणे. यासाठी दोन चमचे दह्यात दोन चमचे मेथीच्या दाण्यांची पेस्ट मिसळा. आता हे मिश्रण डोक्याला चांगले लावा. ते केसांवर कमीत कमी 40 ते 45 मिनिटे राहू द्या, नंतर केस धुवा. हे केवळ केसांना मजबूत करत नाही तर केसांना हायड्रेट करते आणि चमक देखील देते. मेथीचे दाणे हे एक अद्भुत नैसर्गिक उपाय आहे, जे केसांसाठी फायदेशीर आहे. हे केस गळती थांबवते, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते, कोंडा दूर करते आणि केसांना निरोगी बनवते. या घरगुती उपायाचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकता.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.