केसांच्या समस्यांवर कोरफड ठरते रामबाण उपाय, असा करा वापर…

| Updated on: Feb 22, 2022 | 9:23 AM

केसांसह, कोंड्यामुळे होणारी टाळूची खाज, त्वचा, पोटाच्या समस्या आदींवर कोरफड (aloe vera) रामबाण उपाय आहे. कोरफडीचा वापर (aloe vera Use ) करून अनेक कृत्रिम प्रोडक्ट तयार करण्यात येत असतात. तिचा वापर कसा करावा याबाबत अजूनही अनेकांना माहित नसते. आज आपण कोरफडीच्या वापराबद्दल माहिती घेणार आहोत.

केसांच्या समस्यांवर कोरफड ठरते रामबाण उपाय, असा करा वापर...
केसांच्या समस्या
Follow us on

वाढते प्रदुषण, जीवनपध्दती आदींचा परिणाम आपल्या त्वचा (Skin) व केसांवर होत असतो. अनेकांना डोक्यात कोंडा होणे, केस अकाली पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे अशा अनेक केसं व त्वचेशी संबंधित समस्या असतात. त्यावेळी आपल्याला अनेक जणांकडून यावर कोरफड (aloe vera use) वापरण्याचा सल्ला देण्यात येत असतो. कोरफडीच्या गराच्या माध्यमातून केसांच्या अनेक समस्या सहज सुटतात. डोक्याची खाज दूर करण्यासाठीही कोरफडीचा वापर उत्तम समजला जात असतो. बहुतेक लोकांना कोरफडच्या गुणधर्मांबद्दल माहिती आहे, परंतु तिचा उपयोग (Use) कसा करावा, याबाबत पाहिजे तशी माहिती नसते. त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा गर हा सर्वोत्तम मानला जात असतो. कोरफडीचे फायदे ती कशी वापरावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

केसांच्या समस्येवर घरगुती उपाय

ऋतू बदलामुळे साहजिकच आपले केस, त्वचा प्रभावित होत असते. वास्तविक, अनेकदा डोक्याच्या रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. टाळू जास्त काळ कोरडी राहिल्यास त्यावरील कोरडेपणामुळे कोंडा होतो आणि हळूहळू केस गळतीला सुरुवात होते. कोंड्यामुळे काही वेळाने डोक्यात तीव्र खाजही सुटते. त्यामुळे केसांची निगा राखणे आवश्यक आहे. बाजारात मिळणार्‍या उत्पादनांमधून केसांची खाज दूर करण्याचा सल्ला दिला जात असला तरी, यासाठी घरगुती उपाय देखील प्रभावी मानले जातात.

कोरफड सीरम

कोरफड सीरम बनवण्यासाठी तुम्हाला खोबरेल तेल, गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई तेलाची आवश्‍यकता लागेल. या सर्व गोष्टी योग्य प्रमाणात मिसळा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. आता हे मिश्रण हलक्या हातांनी केसांना लावा. यासाठी तुम्ही हेअर ब्रश देखील वापरू शकता. आंघोळीपूर्वी हे सीरम लावणे चांगले असते. हे मिश्रण लावल्यानंतर केस धुण्यासाठी साधे पाणी वापरावे.

कोरफड आणि कडुलिंब

कोरफडी व्यतिरिक्त, कडुलिंबात देखील अनेक औषधी  गुणधर्म आहेत, ज्यामुळे डोक्यातील खाज मुळापासून दूर होण्यास मदत मिळत असते. कोरफड आणि कडुलिंब  ‘हेअर मास्क’ तयार करण्यासाठी, कोरफड जेलमध्ये कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिसळा. ही पेस्ट टाळूवर लावा. कडुलिंबाच्या औषधी आणि जंतुनाशक गुणधर्मांच्या मदतीने खाज दूर होते. आठवड्यातून एकदा ही पेस्ट वपरावी.

कोरफड आणि तुळस

तुळशीला केस आणि त्वचेसाठी उत्तम मानले जाते. फार पूर्वीपासून तुळशीचा वापर केला जात आहे. आयुर्वेदातही तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळशीची 10 ते 12 पाने पाण्याच्या साहाय्याने बारीक करून त्यात कोरफड जेल मिक्स करून नीट ढवळून घ्यावे. आता ही पेस्ट केसांना लावा. यामुळे टाळूची खाज निघून जाईल, तसेच केस निरोगी राहतील. कोरफड आणि तुळशीपासून बनवलेला हा मास्क आठवड्यातून दोनदा लावा.

 संबंधित बातम्या

काय सांगतात तुमचे डोळे? जाणून घ्या एका क्लिकवर

Diabetes tips: जोराने घोरल्यामुळे तुमच्या घरचे वैतागले आहेत? करू नका दुर्लक्ष अन्यथा होऊ शकतो डायबिटीज!!

आईसक्रीम खाल्ल्यावर अचानक डोके दुखतेय? मेंदू सुन्न होण्याच्या समस्यापासून करा अशा प्रकारे सुटका!