Tomato fever : भारतातही झपाट्याने पसरतोय ‘टॉमेटो फिव्हर’ जाणून घ्या, काय आहेत लक्षणे? कोणाला आहे सर्वाधिक धोका!

What is Tomato fever : टोमॅटो फ्लू किंवा टोमॅटो ताप भारतात वेगाने पसरत आहे. त्याबद्दल बोलायचे झालेच तर टॉमेटो फिव्हर हा ताप मुलांना आपल्या मगरमिठीत घेत आहे. यामध्ये, त्वचेवर लाल पुरळं, त्वचेची जळजळ आणि डिहाइड्रेशनच्या त्रासाला सामोरे जावे लागते.

Tomato fever : भारतातही झपाट्याने पसरतोय ‘टॉमेटो फिव्हर’ जाणून घ्या, काय आहेत लक्षणे? कोणाला आहे सर्वाधिक धोका!
भारतातही झपाट्याने पसरतोय ‘टॉमेटो फिव्हर’ जाणून घ्या
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 6:32 PM

जगासोबतच भारतही गेल्या काही वर्षांपासून कोरोना या महामारीशी लढा देत आहे. कोरोना महामारीनंतर जगभरातील वैद्यकीय संशोधन क्षेत्राची म्युकर मायकॉसीस (Muker mycosis) ने चिंता वाढवली. हे कमी म्हणून की काय, नंतर मंकीपॉक्सची दहशत वाढली, आता आणखीन एका नवीन आजाराने दार ठोठावले आहे. हँड फूट माउथ डिसीज (HFMD), ज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात, हा आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण तो लहान मुलांमध्ये झपाट्याने पसरतो हे विशेष. लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलमधील अभ्यासानुसार, केरळमध्ये 6 मे 2022 रोजी टोमॅटो फ्लूचा (Tomato flu) पहिला रुग्ण आढळला होता आणि आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा ताप एक ते पाच वर्षे वयोगटातील मुले आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत (Weak immunity) असलेल्या प्रौढांना आपल्या कचाट्यात ओढतो.

82 प्रकरणे नोंदवली

नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की, “आपण कोविड-19 च्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सामना करत असताना, टोमॅटो फ्लू म्हणून ओळखला जाणारा एक नवीन विषाणू भारतातील केरळ राज्यात 5 वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे लहान मुलांमध्ये दिसून आले. आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.” आता अशा परिस्थितीत टोमॅटोच्या तापापासून दूर राहण्यासाठी टोमॅटो-फ्लू किंवा टोमॅटो फिव्हर म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे? त्याचा प्रसार कसा होतो? लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळता येईल?

टोमॅटो फ्लू म्हणजे काय?

इंडिया टूडेच्या मते, लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे. की, टोमॅटो फ्लूची लक्षणे कोविड-19 व्हायरससारखीच आहेत. परंतु हा विषाणू SARS-CoV-2 शी संबंधित नाही, तो पूर्णपणे वेगळा आहे. चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापानंतर मुलांमध्ये टोमॅटो-फ्लू होऊ शकतो. या फ्लूचे नाव टोमॅटो-फ्लू आहे कारण यामुळे संपूर्ण शरीरावर लाल आणि वेदनादायक फोड येतात. या फोडांचा आकार टोमॅटो एवढाही असू शकतो.

हे सुद्धा वाचा

टोमॅटो फ्लूचा धोका कोणाला आहे?

“लहान मुलांना टोमॅटो फ्लूचा धोका अधिक असतो कारण विषाणूजन्य संसर्ग या वयात मुलांपेक्षा जास्त होतो,” असे लॅन्सेट अहवालात म्हटले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या अवस्थेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. विशेषतः टोमॅटो फ्लू, अत्यंत संसर्गजन्य असूनही, जिवाला धोका नाही.

टोमॅटो-फ्लूची लक्षणे काय आहेत?

टोमॅटो-फ्लू असलेल्या मुलांमध्ये दिसणारी प्राथमिक लक्षणे चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापासारखीच असतात. लक्षणांमध्ये उच्च ताप, पुरळ, सूजलेले सांधे, मळमळ, अतिसार, डिहायड्रेशन(निर्जलीकरण), तीव्र सांधेदुखी यांचा समावेश होतो. शरीर दुखणे, ताप आणि थकवा ही इतर लक्षणे कोविड-19 रुग्णांनी अनुभवली आहेत. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या त्वचेवर फोडांचा आकार लक्षणीय वाढला होता.

टोमॅटो फ्लूचे कारण

टोमॅटो फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत, परंतु सध्या हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात आहे. डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो, असेही काहींनी सुचवले आहे. शास्त्रांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत हा व्हायरस आहे, परंतु तो कोणत्या विषाणूंमुळे पसरत आहे किंवा कोणत्या विषाणूशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही?

टोमॅटो फ्लू उपचार

टोमॅटो फ्लूपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर स्वच्छ राहण्याचा सल्ला देतात. हा विषाणू पाच वर्षांखालील मुलांसाठी अधिक घातक असल्याचे मानले जाते. तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. लहान मुले किंवा ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे. जास्त पाणी प्या.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.