AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळी येण्यापू्र्वी मूड स्विंग्स होतात का ? हे उपाय ठरू शकतील फायदेशीर

मासिक पाळी किंवा पीरियड्स येण्यापूर्वी तुम्हालाही मूड स्विंगचा त्रास जाणवत असेल तर काही उपायांच्या मदतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो.

मासिक पाळी येण्यापू्र्वी मूड स्विंग्स होतात का ? हे उपाय ठरू शकतील फायदेशीर
Image Credit source: freepik
| Updated on: Aug 11, 2023 | 2:48 PM
Share

How To Deal With PMS : मासिक पाळी (periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक मुलीला, महिलेला आयुष्यात त्याचा सामना करावाच लागतो. महिन्यातील ‘ते’ चार दिवस सर्व महिलांसाठी सारखेच नसतात. कोणाला कमी त्रास होतो, तर कोणाला जास्त. या काळात पोटदुखी, पाठदुखी, ओटीपोट दुखणं , हेवी फ्लो, अशा अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. पीरियड्स येण्यापूर्वी महिलांमध्ये अनेक संकेत (symptoms) दिसू लागतात, पण काहींमध्ये ही लक्षणे दिसतही नाहीत.

काही महिलांमध्ये इमोशनल आणि शारीरिक बदल दिसून येतात. त्यांना प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम असे म्हटले जाते. मासिक पाळी किंवा पीरियड्स येण्यापूर्वी तुम्हालाही मूड स्विंगचा त्रास जाणवत असेल किंवा इमोशनल बदलांचा सामना करावा लागात असेल तर काही उपायांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.

पीएमएस म्हणजे काय ?

पीएमएस म्हणजे प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम (Premenstrual syndrome -PMS). बऱ्याच महिला अशा असतात, ज्यांना पाळी सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात. उदा- चिडचिडेपणा, स्तनांमध्ये वेदना होणे, किंवा सूज येणे, इत्यादी. यामुळे दैनंदिन जीवनावर, कामावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. काही स्त्रियांचं तर कामाच लक्षच लागत नाही. साधारणत: ही लक्षणे पाळी सुरू होण्यापूर्वी दिसू लागतात आणि ती सुरू झाल्यावर थांबतात.

पीएमएसची लक्षणे कमी करण्यासाठी उपाय

1) पाळी सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या मूड स्विंगचे मुख्य कारण म्हणजे, शरीरात होणारा हार्मोनल बद. तो मॅनेज करण्यासाठी तुम्ही डाएट अथवा आहारात बदल केला पाहिजे. अशी वेळी तुम्ही फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन बी आणि लोह असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. थकवा दूर करण्यासाठी फळांचे सेवन करणेही वाढवले पाहिजे. हिरव्या भाज्या, डाळी, फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यानेही आराम मिळू शकतो.

2) पीएमएसची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही हळद घातलेला चहादेखील पिऊ शकता. कारण त्यामध्ये असलेले कर्क्यूमिन हे वेदना कमी करण्यात प्रभावी असते. तसेच त्यामुळे आपला मूडही सुधारतो.

3)पीएमएसची लक्षणे दूर करायची असतील तर तुम्ही मेडिटेशन आणि व्यायामाची मदतही घेऊ शकता. ॲरोबिक्स, सायकलिंग, पोहोणे, जॉगिंग असे विविध प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता. यामुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन रिलीज होते, हे हॅपी हार्मोन्स असतात. त्यामुळे मूड सुधारतो.

4) मूड स्विंग होण्यामागे काही शारीरिक समस्यादेखील असू शकतात. सतत थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, असा त्रास असू शकतो. यामुळे वारंवार चिडचिड होते, राग येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमच्या सप्लीमेंट्सचे सेवन करू शकता. त्यामुळे मूड स्विंगचा प्रभाव कमी होऊ शकतो. मात्र या सप्लीमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात, स्वत:च्या मनाने नव्हेत.

5) अशा काळात बिलकूल स्ट्रेस घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी आराम करा. ध्यान करणे, योगासने करावीत. यामुळे इमोशनल संतुलन सुधारण्यास मदत मिळते.

6) प्रक्रिया केलेले, पॅक केलेले, जास्त मीठ असलेले अन्न पदार्थ खाणे टाळावे. मीठामुळे ब्लोटिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वॉटर रिटेंशन, अंग दुखणे, शरीरावर सूज येणे असा त्रासही होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?