महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत

मासिक पाळी दरम्यान वेदना होणे हे सामान्य आहे, परंतु आपण या दुखण्याकडे जास्त दुर्लक्ष करणे धोकेदायक ठरु शकते, कारण हे काही गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. इंडोमेट्रिओसिस हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होतात. अनियमित मासिक पाळी हे देखील इंडोमेट्रिओसिसचे लक्षण आहे.

महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच... या गंभीर आजाराचे संकेत
periods pain
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:30 AM

मुंबई : मासिक पाळीच्या काळात महिलांना क्रॅम्प येणं सामान्य गोष्ट आहे. परंतु ही समस्या जेव्हा वारंवार निर्माण होते, तेव्हा त्याकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. हे काही आजाराचे (disease) लक्षण तर नाही ना? हे पाहणे महत्वाचे ठरते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना (pain) हे इंडोमेट्रिओसिस (Endometriosis) नावाच्या आजाराचे लक्षण असू शकते. या आजारात, गर्भाशयाच्या अस्तराच्या ऊतीप्रमाणेच स्त्रियांच्या गर्भाशयाच्या बाहेरदेखील ऊती तयार होण्यास सुरुवात होते. गर्भाशयाचे हे ऊतक गर्भाशयाचे अस्तर बनवणाऱ्या ऊतकांप्रमाणेच विकसित होते आणि कार्य करते. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’शी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्निगुओल मार्टीकिएन सांगतात, की ‘जर एखाद्याला इंडोमेट्रिओसिस झाला असेल तर आपल्याला त्यात अनेक लक्षणे दिसतात. मासिक पाळीत वेदना, सहा महिन्यांहून अधिक काळ ओटीपोटात वेदना, अनियमित रक्तप्रवाह सूज येणे, दीर्घकाळापर्यंत थकवा येणे ही त्याची लक्षणे आहेत.

इंडोमेट्रिओसिस विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागतात आणि सुरुवातीच्या काळात त्याचे निदान करणे खूप कठीण असते. डॉ. स्निगुओल मार्टीकिएन सांगतात, ‘गर्भाशयाचे अस्तर बनवणाऱ्या पेशींमध्ये इंडोमेट्रियल टिश्यू तयार करण्याची आणि वाढण्याची क्षमता असते. यामुळे हा आजार वाढत जातो आणि त्याचे चार टप्पे असतात. जर रोगाचा टप्पा वाढला तर इंडोमेट्रिओसिसमुळे वंध्यत्व आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होउ शकतात. हा आजार जितक्या लवकर ओळखला जाईल तितके उपचार करणे सोपे असते. इंडोमेट्रिओसिस शोधण्यासाठी सुमारे सात ते बारा वर्षे लागतात. किशोरवयीन काळात मासिक पाळीच्या वेदनांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

ही लक्षणे दिसतात तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मासिक पाळीच्या तीव्र वेदनांच्या तक्रारी तरुण मुलींमध्ये जास्त असतात. ‘जेंटल डे’ या स्त्री स्वच्छता उत्पादनांच्या ब्रँडचे संस्थापक, विल्मांटे मार्केविसीन म्हणतात, पौगंडावस्थेतील मुलींमध्ये हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात, त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या काळात जास्त वेदना सहन कराव्या लागतात. परंतु मासिक पाळीच्या वेदनांमुळे मुली शाळा किंवा इतर काम चुकवत नाहीत त्याऐवजी, वेदना कमी करण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन क्रियाकलाप सुरू ठेवण्यासाठी वेदनाशामकांचा वापर केला पाहिजे. कोणत्याही किशोरवयीन मुलास हृदयाचे ठोके जलद होणे, जळजळ होणे, मासिक पाळीच्या वेळी खूप तीव्र वेदना यासारख्या समस्या असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इंडोमेट्रिओसिसची लक्षणे

1) मासिक पाळी आणि अनियमित मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदनांसह जास्त रक्तस्त्राव.

2) लघवी करताना वेदना

3) नेहमी थकल्यासारखे वाटणे

4) मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात तीव्र वेदना

स्त्रियांच्या वयानुसार, इंडोमेट्रिओसिसची लक्षणे देखील भिन्न दिसतात. इंडोमेट्रिओसिस असलेल्या वृद्ध महिलांना संबंधांवेळी वेदना होतात. गर्भधारणा न होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. एंडोमेट्रिओसिसचे निदान लक्षणांच्या आधारे लेप्रोस्कोपीद्वारे केले जाते. मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना होउ शकतात. फायब्रॉइड्स, पेल्विक इन्फ्लमॅट्रॉय डिसीज किंवा इडेनोमायोसिस सारखे रोग त्या मागील कारण असू शकतात.

इतर बातम्या-

Video: औरंगाबादमध्ये मारहाणीच्या घटना का वाढतायत? आता पाचोड गावात मंडळ अधिकाऱ्याला बदडलं

नवरा बायकोचा वाद, संसारात घात, बायकोनं भांडणात घर सोडलं, नवऱ्यानं जे केलं त्यानं नागपूर हादरलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.