Breathlessness: ‘ या ‘ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो श्वास घेण्यास त्रास, अशी करा व्हिटॅमिनची कमतरता दूर !
या एका व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो तसेच हाडांमध्ये वेदना होण्याची समस्याही होते. कोणत्या व्हिटॅमिनमुळे हा त्रास होतो व त्याची कमतरता कशी दूर करता येईल, हे जाणून घेऊया.

मुंबई : दम लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. खेळणे, उड्या मारणे, जिन्याच्या पायऱ्या चढणे, पळणे किंवा चढ चढणे अशा क्रिया केल्याने दम लागू शकतो. मात्र वेळी-अवेळी कोणत्याही कारणामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल (Breathing Problems) तर ही एखाद्या आजाराची सुरूवात असू शकते. किंवा एखादे पोषक तत्वाची कमतरता असल्यामुळेही असे होऊ शकते. असेच एक व्हिटॅमिन आहे, ज्याच्या कमतरतेमुळे साधारणत: श्वास घेण्यास त्रास होण्याची (Breathlessness) समस्या होऊ शकतो. या व्हिटॅमिनचे नाव आहे, व्हिटॅमिन डी (Vitamin D). यालाच सनशाइन व्हिटॅमिनही म्हणतात.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होणे –
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, खूप कमी खाद्यपदार्थांमध्ये हे व्हिटॅमिन असते. त्याचा मुख्य स्त्रोत आहे सूर्यप्रकाश. म्हणजेच ज्या लोकांच्या आहारात व्हिटॅमिन डी नसते व जे सूर्यप्रकाशात बाहेर पडत नाहीत, त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊन, आरोग्याच्या समस्या सुरू होतात. त्यामधील एक समस्या म्हणजे, श्वास घेण्यास त्रास होणे.
व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे लक्षण –
– श्वास घेण्यास त्रास होणे
– स्नायू कमजोर होणे
– हाडे कमजोर होणे (Weak Bones) व हाडांमध्ये वेदना
– हाडांची घनता कमी झाल्याने चालताना सांध्यामध्ये तीव्र वेदना होणे
– जखम लवकर भरून न येणे किंवा जखम भरण्यास वेळ लागणे.
– लहान मुलांच्या दातांची समस्या उद्भवणे.
व्हिटॅमिन डी चे स्त्रोत –
– व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रमुख स्त्रोताची मदत घ्यावी. पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाल्याने ही कमतरता दूर होते. यासाठी आठवड्यातून 3 दिवस कमीत कमी 15 मिनिटे उन्हात चालावे. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळू शकेल.
– तसेच अंडी देखील व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत मानली जातात. त्यासाठी एक संपूर्ण अंडे सेवन करा. अंड हे जीवनसत्त्वे तसेच प्रथिने, चरबी आणि इतर खनिजांचा देखील चांगला स्रोत आहे.
– मशरूमच्या माध्यमातूनही शरीराला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळू शकते. मशरूमची भाजी किंवा सँडविच, पास्ता या माध्यमातून तुम्ही मशरूमचे सेवन करू शकता.
– तसेच व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सॅल्मन मासा हा देखील चांगला पर्याय आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
– शेवटी व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स यांचे सेवन करूनही या व्हिटॅमिनची कमतरता दूर करता येऊ शकते.
