AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Child care: वेळेआधी जन्मणाऱ्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवायची असेल तर या काही टिप्स नक्कीच फॉलो करायला हव्यात!

New born baby care: अनेकदा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेळे आधीच बाळाचा जन्म होतो. वेळे आधी बाळाचा जन्म झाल्यामुळे बाळाच्या शरीरातील अवयव पूर्णपणे व्यवस्थितरित्या कार्य करत नाही, अशावेळी नवजात बालकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील पूर्णपणे विकसित झालेली नसते.

Child care: वेळेआधी जन्मणाऱ्या नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनवायची असेल तर या काही टिप्स नक्कीच फॉलो करायला हव्यात!
Baby healthImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 7:09 PM
Share

मुंबईः मातृत्व हे स्त्री ला लाभलेले एक वरदान आहे, प्रत्येक स्त्री गरोदरपणामध्ये (Pregnancy tips) स्वतःची आणि आपल्या पोटातील बाळाची काळजी घेत असते. प्रत्येक वेळी काळजी घेऊन देखील काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते आणि वेळेच्या आधीच एखाद्या बाळाचा जन्म होतो ,अशा वेळी स्त्रीला आणि नवजात बालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा मातेला 9 महिने पूर्ण न होताच 36 आठवड्यामध्ये बाळाचा जन्म होतो, या परिस्थितीला प्री मॅच्युअर बेबी असे म्हटले जाते. वेळेआधीच जन्माला आलेली मुले अनन्यसाधारण मुलांपेक्षा तब्येतीने नाजूक असतात. या मुलांची आपल्याला विशेष प्रकारे काळजी व देखभाल करणे गरजेचे असते. प्री मॅच्युअर बेबी (Premature baby care) चा जन्म झाल्यावर काही दिवसा पर्यंत आपल्याला नर्सरीच्या आयसियू मध्ये सुद्धा ठेवण्याची गरज भासते. असे म्हटले जाते की, अनेकदा वेळेच्या आधी जन्माला आलेल्या मुलांच्या शरीरातील अवयवांची वाढ सुद्धा पूर्णपणे झालेली नसते. तज्ञ मंडळीच्या मते, वेळेच्या आधी जन्माला आलेली बालके यांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity boosting) खूपच कमकुवत असते. या मुलांच्या शरीरातील अँटीबॉडी खूपच कमी असतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने या मुलांना सहज असा एखादा व्हायरल आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच आपल्याला नवजात बालकांची काळजी व त्यांची व्यवस्थित देखभाल करणं आवश्यक आहे.

तज्ञ मंडळींच्या मते , वेळेच्या आधी जन्मलेल्या नवजात बालकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू विकसित होते. या काळात या मुलांची आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते अन्यथा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम भविष्यात होऊ शकतो.या नवजात बालकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला जर मजबूत करायची असेल तर काही टिप्स देखील फॉलो करणं गरजेचे आहे. आजच्या लेखामध्ये आपण असेच काही सोपे टिप्स व काही उपाय जाणून घेणार आहोत त्यामुळे नवजात बालकांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सहजच मजबूत बनण्यासाठी मदत होईल.

खाण्यापिण्याकडे लक्ष देणं

नवजात बालकांना खाण्यापिण्याचे पदार्थ लगेच आपण घेऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला आईच्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आईच्या आहारामध्ये अनेक असे काही पोषक तत्व उपलब्ध करायला हवेत ज्यामुळे आईच्या दुधाच्या सहाय्याने बाळाला पोषक तत्व मिळू शकतील. सहा महिन्यानंतर आपण मुलाला खाण्यास काही पदार्थ देऊ शकतो परंतु त्याआधी बाळ पूर्णपणे आईच्या दुधावरच अवलंबून असते. आपण आईच्या दुधाशिवाय काही विटामिन असलेले पदार्थ देखील मुलांना खाण्या – पिण्यास देऊ शकतो.

संक्रमण पासून वाचवा

वेळेआधी जन्मलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत असते, अशा वेळी कोणताही आजार या लहान मुलांना त्वरित होण्याची शक्यता असते. नवजात बालकांना हॉस्पिटलमधून घरी आनल्यानंतर त्यांच्या स्वच्छता बद्दलची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, तसे पाहायला गेले तर प्री मॅच्युअर बेबी ची काळजी घेणे गरजेचे आहे पण त्याचबरोबर सर्वसामान्य बालकांची सुद्धा स्वच्छता नीट ठेवायला हवी. ही नवजात बालके जास्त लोकांच्या संपर्कात येणार नाही अशी योजना देखील करायला हवी, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा धोका त्यांना होणार नाही.

नेहमी मालिश करणे

प्री मॅच्युअर बेबी ची जर आपण नियमितपणे मालिश केली तर नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तज्ज्ञ मंडळींच्या मते, लहान मुलांची जर व्यवस्थित रित्या मालिश केली तर त्यांच्या शरीरातील अवयव वेगाने कार्य करू लागतात. मालिश करताना जीवनावश्यक तेलाचा म्हणजेच राईचे तेल,मोहरीचे तेल, खोबरेल तेलाचा वापर करायला हवा. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी डॉक्टरसुद्धा बाळाची तब्येत सदृढ बनवण्यासाठी मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. बाळ जन्माला आल्यानंतर एका वर्षापर्यंत दिवसभरातून कमीत कमी एकदा तरी बाळाची मालिश करायला पाहिजे.

अशाप्रकारे आपण या काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही आणि जरी बाळ वेळेआधी जन्मले असले तरी त्याच्या शरीरातील अन्य अवयवांची वाढ देखील व्यवस्थित रित्या होईल म्हणून जर तुमचेही बाळ वेळेआधी जन्माला आले असेल तर बाळाची काळजी अवश्य घ्या.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच बाळाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

Sugar level : सकाळी साखरेची पातळी किती असावी? जाणून घ्या ‘या’ महत्त्वपूर्ण गोष्टी

Health Care Tips | काय आहे चिया बियाणे, कसा कराल चिया बियाणांचा आहारात सामावेश, जाणून घ्या चिया बियाणांविषयी

Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.