AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हा खास जुस, कोलेस्ट्रोलही राहील कमी

 तुम्हाला फळे आणि भाज्यांचे ज्यूस पिण्याची आवड असेल, तर हा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट ज्यूस तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमची फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यात याची नक्कीच मदत होईल.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या हा खास जुस, कोलेस्ट्रोलही राहील कमी
आरोग्यदायी जुसImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jan 15, 2023 | 7:14 PM
Share

मुंबई, 2023 मध्ये अनेकांनी वजन कमी (Weight loss) करण्याचा संकल्प केला आहे. मात्र, यातील बहुतांश लोकं स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दरवर्षी असा संकल्प करतात. वजन कमी करण्याच्या आहारापासून ते प्रोटीन शेक, स्मूदी, ज्यूस आणि चहापर्यंत, वजन कमी करण्यासाठी कार्य करणारे पदार्थ आणि उत्पादनांची कमतरता नाही. भरपूर जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे, फळे आणि भाज्या शरीरातून काही अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.

कसा बनवाल रस

तुम्हाला फळे आणि भाज्यांचे ज्यूस पिण्याची आवड असेल, तर हा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट ज्यूस तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमची फिटनेसची उद्दिष्टे साध्य करण्यात याची नक्कीच मदत होईल. जाणून घेऊया हा रस कसा बनवायचा. 1 मध्यम गाजर, अर्धे सोललेले सफरचंद, 1 बीटरूट, 1 चमचे मध आणि अर्धा कप पाण्यापासून हा चमत्कारी रस तयार केला जाऊ शकतो. ज्यूस बनवण्यासाठी हे सर्व साहित्य घ्या आणि एकत्र बारीक करा. हा रस तुम्ही काही वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा लगेच पिऊ शकता.

हा रस पिण्याचे फायदे

बीटरूट वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्सिफाय करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात चरबी म्हणजेच फॅटचे प्रमाण कमी आणि आहारातील फायबरचे प्रमाण जास्त आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. सफरचंदात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पाणी आणि पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. गाजरांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात विरघळणारे आणि अघुलनशील फायबर असतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्हाला जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. मधामध्ये चांगले पोषक घटक असतात जे जास्त चरबी जाळण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करते.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....