AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hot Water for Fat Burn: वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिताय? जाणून घ्या योग्य पद्धत

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही लोक गरम पाण्याची मदत घेतात. खरंतर केवळ गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होत नाही. अशा वेळी गरम पाण्यात मध मिसळून पिणे खूप फायदेशीर ठरते.

Hot Water for Fat Burn: वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिताय? जाणून घ्या योग्य पद्धत
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 14, 2023 | 1:53 PM
Share

नवी दिल्ली – अयोग्य जीवनशैलीमुळे अनेक लोक लठ्ठ होतात. लठ्ठपणाचा सामना (obesity) करणारे लोक चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. काही लोकं चरबी जाळण्यासाठी (fat burn) गरम पाणी देखील पितात. पण गरम पाणी प्यायल्याने (hot water) खरंच शरीरातील चरबी कमी होते का? गरम पाणी पिण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काही लोकांना वाटतं की गरम पाणी प्यायल्याने पोटाची चरबीही कमी होऊ लागतेच .

पण काही लोकं सत्य जाणून न घेता गरम पाणी पिण्यास सुरुवात करतात. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

गरम पाणी पिण्याचे फायदे

फॅट बर्न करण्यासाठी गरम पाणी प्यावे

वजन कमी करण्यासाठी केवळ गरम पाणी पिणे हे फारसे फायदेशीर ठरत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडासा मध मिसळून त्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील चरबी वेगाने कमी होते.

वजन कमी करण्यास फायदेशीर

मध आणि गरम पाण्यात असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, अमिनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि नियासिन हे घटक शरीरातील कॅलरी आणि साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.

डिटॉक्सिंगसाठी ठरते प्रभावी

मध आणि गरम पाण्याचे मिश्रण शरीरासाठी सर्वोत्तम डिटॉक्सिंग एजंट असल्याचे सिद्ध होते. कोमट पाण्यात मध मिसळून नियमितपणे प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही.

मेटाबॉलिज्म राहते मजबूत

कोमट पाण्यासोबत मधाचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म मजबूत होते. यामुळे अन्न सहज पचते तसेच पोटाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत त्याच वेळी, जेवल्यानंतर गरम पाण्याचे सेवन केल्याने फॅट मॉलिक्यूल तोडून वजन कमी करण्यास मदत होते.

व्हायरल इन्फेक्शन दूर राहील

गरम पाणी आणि मध यांचे सेवन केल्याने तुम्ही व्हायरल इन्फेक्शनवरही मात करू शकता. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल घटक हे सर्दी, खोकला आणि तापापासून आराम मिळवून देण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.