AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Story: लठ्ठपणाचे टोमणे ऐकून रात्रभर रडायची.. नवऱ्याने तयार केलेल्या डाएट प्लॅनद्वारे घटवले 31 किलो वजन

Weight loss: एका महिलेला तिच्या वाढलेल्या वजनामुळे खुप लोकांचे टोमने एकावे लागले. परंतु, तिने दृढ निश्चीय केला आणि, आपले वाढलेले वजन नियंत्रणात आणले. जाणून घ्या, एका आईची कहाणी, तिने आपल्या, नवऱ्याने बनवलेल्या डाएट प्लॅन फॉलो करून, तब्बल 31 किलो वजन कमी केले.

Weight Loss Story: लठ्ठपणाचे टोमणे ऐकून रात्रभर रडायची.. नवऱ्याने तयार केलेल्या डाएट प्लॅनद्वारे घटवले 31 किलो वजन
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 1:52 PM
Share

गर्भधारणेनंतर वजन वाढणे ही सामान्य गोष्ट आहे. नॅशनल हेल्थ सर्विस (National Health Service) नुसार, बाळंतपणानंतर महिलांचे वजन 10-12 किलो वाढणे सामान्य आहे. वास्तविक, गरोदरपणात महिलांना तुप, काजु, बदाम इत्यादी मजबूत पदार्थ खायला दिले जातात. जेणेकरून आई आणि मूल निरोगी राहते. याशिवाय शारीरिक हालचालींचा अभाव आणि इतर कारणांमुळे गर्भवती महिलांचे वजन (Weight of pregnant women) वाढते. मुलाला जन्म दिल्यानंतर काही महिलांचे वाढलेले वजन पुन्हा कमी होते, तर काही स्त्रिया मुलाच्या संगोपनामुळे स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाहीत. अश्याच एका आईने गरोदरपणानंतर तिचे वाढलेले वजन कमी केले आहे. माध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे वजन 84 किलो झाले होते पण नवऱ्याने तयार केलेल्या डाएट प्लॅनद्वारे (Through a diet plan) तिने 31 किलो वजन कमी केले आहे.

का वाढले वजन

मोहाली येथे राहणाऱया 23 वर्षाच्या हरमन सिद्धूने सांगितले की, “लग्नापूर्वी मी खूप स्लिम होते. माझे वजन ४५ किलोच्या आत असायचे. पण जेव्हा मी गरोदर राहिले तेव्हा माझे वजन दर महिन्याला ४-५ किलोने वाढले. सी-सेक्शनने मुलगी झाली, दोन दिवसांनी मी नवऱ्याला म्हणाले, ‘आधी वजनाचे मशिन आणा, मला माझे वजन तपासायचे आहे, त्यानंतर जेव्हा त्यांनी मशिन आणली आणि मी माझे वजन पाहिले तेव्हा माझे वजन 83 किलो होते. वजन पाहून तिला धक्काच बसला आणि रडायला लागली. पतीने मला समजावले की मी वॉटर वेट होल्ड केले आहे त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही.

त्यामुळे मी रात्रभर रडायचे

हरमन पुढे म्हणते, “जेव्हा मी हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हा बाळाला दूध पाजणे, डायपर बदलणे, काळजी घेणे इत्यादी गोष्टींमुळे मी चिडचिड करत होते. मी ज्या बाळाची 9 महिने वाट पाहत होतो, त्याचा जन्म झाला तेव्हा मला वाईट वाटले, आणि मी नैराश्यात जगू लागले. वैद्यकीय शास्त्रात याला प्रसूतिपश्चात उदासीनता (एक प्रकारचा मानसिक आजार) असे म्हणतात. प्रसूतिपूर्व नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मला तीन महिने लागले. असे देखील म्हणता येईल. की, मला तीन महिने माझी मुलगी जाणवली मात्र, जेव्हा माझे वजन वाढत होते. गरोदरपणात, मुलाच्या जन्मानंतर मला वजन कमी करायचे आहे, असे मी मनाशी ठरवले होते. बाळाच्या जन्मानंतर अनेकांनी माझे वजन खुप आहे, अशा नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या. मला याचा विचार करायला भाग पाडले. त्यामुळे मी रात्रभर रडायचे

पतीने दिला डाएट प्लॅन

ती पुढे म्हणाली, “माझे पती फिटनेस कोच आहेत आणि त्यांनी मला वजन कमी करण्यास मदत केली. माझा आहार-वर्कआउट प्लॅन सर्व पतींनी तयार केला होता. त्यांचा पाठिंबा केवळ आहार-व्यायामपुरता मर्यादित नव्हता. तर, मी जेव्हा घरी व्यायाम करते तेव्हा ते देखील हजर असायचे.” मी जेव्हा जिमला जायला लागले तेव्हा तो घरी मुलाची काळजी घ्यायचा. नवऱ्याची साथ नसती तर कदाचित मी वजन कमी करू शकले नसतेच.आज माझे वजन 53 किलो आहे आणि माझे एकूण 31 किलो वजन कमी केले.

वजन कमी करण्यासाठी टिप्स

हरमनला वजन कमी करण्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जीमला जायचे तेव्हा आतून काही चुकीचे खाल्ल्यासारखे वाटत नसे. मी स्वतः अनारोग्यकारक पदार्थ टाळायचे. आता तुम्ही जिमला जात असाल तर तशी काळजी घेतली पाहिजे. आजतक हिंदीने याबाबत सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.